गुरूकुलच्या विद्यार्थीनीचे राष्ट्रीय स्पर्धेत यश सुदेष्णा शिवणकर हिची खेलो इंडियासाठी निवड

सातारा : शाहुनगर येथील इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलची विद्यार्थीनी कु. सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने दिल्ली येथे संपन्न झालेल्या 64 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात रिले धावणे (4ु100) प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
त्याचप्रमाणे दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत कु. वैष्णवी संतोष पवार हिने 12 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत वैयक्तिक गटात मध्ये कास्यपदक व सांघिक गटात सुवर्णपदक मिळविले.
गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दोन्ही यशस्वी विद्यार्थीनींना शुभेच्छा देवून सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापिका शिला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्‍वनाथ फरांदे, माध्यमिक विभागाच्या इनचार्ज सौ. सोनाली तांबोळी, प्राथमिक विभागाच्या इनचार्ज सौ. अनुराधा कदम उपस्थित होते.
कु. सुदेष्णा हणमंत शिवणकर हिची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात यापुर्वीच्या स्पर्धेतील वेळेचे सर्व रेकॉर्ड मोडत कु. सुदेष्णा शिवणकर हिने टिमसह विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. दोन्ही खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी आनंद गुरव, मधुकर जाधव, अ‍ॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.