डीजे लावून शांततेचा भंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

फलटण : येथील गजानन चौक येथे रात्री 12 वाजता सार्वजनिक ठिकाणी डीजे लावून शांततेचा भंग केल्या प्रकरणी डीजे चालक व कार्यक्रम आयोजक अशा दोघा विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, दि 22 रोजी गजानन चौक येथे सार्वजनिक ठिकाणी रात्री 12 वाजता राजेंद्र प्रकाश जाधव, (वय 27 रा. लोणंद ता.खंडाळा) यानें आपल्या ताब्यातील एम.एच.06.ए.सी.1089 हा डी.जे सार्वजनिक ठिकाणी लावून शांततेचा भंग केल्या प्रकरणी डी.जे चालक व कार्यक्रमाचे आयोजन करणारा छोटू शेख रा. गजानन चौक, फलटण यांच्या विरोधात कलम 493, 37, 38, 135,136 नुसार कारवाई करण्यात आली असून त्याबाबत फिर्यादी पो.कॉ मुठे यांनी दिली आहे यांचा तपास पो.हा भोईर करत आहेत.