भोजलिंगाच्या डोंगरावरुन जीप दरीत कोसळून 3 ठार; 7 जखमी सांगली जिल्ह्यातील भाविकांवर दर्शनाहून परताना काळाचा घाला

म्हसवड : माण तालुक्यासह राज्यातील लाखो भाविक भक्ताचे श्रद्धास्थान श्री भोजलिंगाच्या डोंगरावर पौर्णिमेच्या दिवसी आज शनिवारी सांगली जिह्यातील विठ्ठलापूर गावातून दर्शनाला आलेल्या भाविकांची जीप गाडी दर्शन घेऊन परतत असताना डोंगरावरून उतरत असताना ताबा सुटल्याने जीप गाडी सरळ खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन तीन जण ठार झाले तर सात जणांवर म्हसवड येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक जण गंभीर असून त्यास अकलूज येथे पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आज पौर्णिमेच्या दिवशी सकाळी माण तालुक्यातील लाखो भाविक भक्ताचे श्रद्धास्थान श्री भोजलिंगाच्या देवदर्शनासाठी विठ्ठलापूर, ता. माण. जि. सोलापूर येथून दहा भाविक भक्त जीप गाडी करून आले होते. जीप क्रमांक चक-10 उ 4341 सकाळी सर्वानी भोजलिंगाचे दर्शन घेतले व परत घरी जात डोंगर उतरत असताना जीप ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने जीप खोल दरीत कोसळली गाडीत दहा प्रवाशी होते. या मधील तीन जण ठार झाले असून इतर जखमींना म्हसवड येथील खाजगी आणि दाखल करण्यात आले आहे. भोजलींग डोंगरावर (माण तालुका) कमांडर जीप दर्शनाहून खाली उतरताना जीप दोनशे फूट दरीत कोसळली.
अपघातात सिंधू धोंडीराम गळवे, मनीषा औदुंबर आटपाडकर, कांताबाई कैलास आटपाडकर, हे तीन मयत एक गंभीर जखमी तसेच 12 जण जखमी जखमी झालेल्या मध्ये वंदना नंदकुमार काळेल,छाया नाथा बाड, इंदूबाई लक्ष्मण बाड, संगीता मोहन आटपाडकर, कमल नाथा बाड, पुष्पा दत्तात्रय बाड, कामीना संदीपान बाड, अंजना सुधाकर काळेल, सखुबाई भीमराव काळेल, आशाबाई छगन काळेल, प्रज्ञा प्रभाकर बाड, लक्ष्मण किसन काळेल हे सर्व जखमी आहेत.
म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीकच्या डोंगरमाथ्यावर श्री भोजलिंग देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी काही भाविक जीपमधून आले होते. मंदिराकडे जाण्यासाठी जांभुळणी आणि वळई गावाकडून असे दोन मार्ग आहेत. त्यापैकी जांभुळणीकडील डोंगर उतारावरील चालकाचा ताबा सुटला आणि जीप किमान दोनशे फूट दरीत कोसळली. या जीपमध्ये अठरा प्रवासी होते.
अपघातातील जीप डोंगरावरून खाली उतरत असताना जीप दगडू खंडू यादव हे चालवीत होते.त्यावेळी खालून वर मारुती व्हॅन येत होती. ज्याठिकाणी दोन्ही वाहने जवळ आली त्याठिकाणी रस्ता अरुंद होता.त्यामुळे दोन्ही वाहनांचा वेग कमी झाला होता.परंतु सदरची जीप बाहेरच्या बाजूस होती.त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला मातीचा ढीग होता. त्याठिकाणी कमांडर जीपचे चाक घसरले व जीप उताराने डोंगराच्या खाली घसरू लागली व पलट्या खात सुमारे दोनशे ते तीनशे फूट खाली गेली. यावेळी कमांडर जीपचा चालक बाहेर बदला व त्याच्या शेजारी बसलेले तुकाराम महादेव काळेल हेही बाहेर पडला.
अपघात स्थळी डीवायएसपी अनिल वडणेरे, म्हसवडचे सपोनि मालोजीराव देशमुख, बिट हवालदार कांबळे यांनी तात्काळ भेट दिली.
अपघात… महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 ला माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पोहचल्या आणि जखमींना पुढील उपचारासाठी म्हसवड येथे दाखल केले, 108 रुग्णवाहिकेमुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली.