मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन
मेढा : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक नररत्न शुरवीर जिवाजी महाले यांची नऊ ऑक्टोंबरला असलेली जिवाजी महाले जयंती या नववर्षापासून शासन दरबारी साजरी करण्यात यावीच. त्यांचे शौर्य आणि त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान जगज्ञात आहे. त्यामुळे तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी असे स्पष्ट मत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री.छ. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले.
सातारा येथे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी निवेदन दिले. याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदनाबाबत आपली भूमिका मांडली.
यावेळी नाभिक महामंडाळाचे जेष्ठ नेते भाऊ दळवी, चंद्रकांत जगताप, सुरेश पवार,महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर काशिद, जिल्हा सचिव अजीत काशिद, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन यादव, सातारा तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत, कार्याध्यक्ष बंटीराजे काशिद, जिल्हा कार्यकारी सदस्य बाबुराव रणदिवे, श्रीकांत पवार, तेजस राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महारांचे विश्वासू अंगरक्षक ,सातारा जिल्हयाचे सुपुत्र कोंढवली ता.वाई येथील रत्न जिवाजी महाले यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला केलेल्या शोर्याची नोंद इतिहासात शिवप्रताप दिन म्हणून सर्व जगाला ज्ञात आहे. स्वराज्य रक्षणासाठी दिलेले त्यांचे योगदान व शौर्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे या पराक्रमी स्वराज्य रक्षक जिवाजी महालेंची नऊ ऑक्टोंबरला होणारी जयंती शासन दरबारी घेण्याचा ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा. अशी आमची आग्रहाची मागणी आहे. शुर वीर जिवाजी महालेंचे स्वराज्य राष्ट्रासाठी योगदान अविस्मरणीय आहे. नाभिक समाज्यातील असलेले जिवाजी महाले यांची सर्व नाभिक बांधव दरवर्षी जिवाजी महाले जयंती साजरी करतात. ही एका समाज्यासाठी मर्यादीत न राहता शासनदरबारी साजरी व्हावी. अशी आमची आग्रहाची मागणी आहे. या वर्षीच हा निर्णय व्हावा.
आपण आपल्या भाषणातही अनेक वेळा जिवाजी महालें बद्दल गौरव उद्गार काढले आहेत. आमची मागणी पुर्ण कराल ही आपणांकडून आम्हांला खात्री आहे. अन्यथा आम्हांला जनआंदोलन करावे लागेल. त्यामुळे विनंतीपुर्वक आपण विचार करावा . या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांच्या सहया आहेत.
कॅप्शन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने निवेदन देताना आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजय सपकाळ आदी.