राज्यातील पहिली चारा छावणी म्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून

राज्यातील पहिली चारा छावणी म्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून
म्हसवडः महाराष्ट्रात अनेक तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.सध्या जनावरांच्या चारा- पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर बनला असल्याने येथील माणदेशी फौंडेशन तर्फे राज्यातील पहिली चारा छावणी माणमधील म्हसवड येथे 1 जानेवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती माणदेशी फौंडेशनकडून देण्यात आली.
माण तालुक्यात सध्या दुष्काळाची तीव्रता खूपच भेडसावू लागली असून जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर तातडीचा तोडगा म्हणून येथील माणदेशी फौंडेशनने बजाज कंपनीच्या सहकार्याने दि.1 जानेवारीपासून येथील सिद्धनाथ मेघा सिटी येथे परिसरातील शेतकर्‍यांसाठी चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी आधार कार्ड,मतदान कार्ड,रेशन कार्डची झेरॉक्स (यापैकी एक ),सरकारी डॉक्टर यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला,शेतकर्‍याचे दोन फोटो तसेच 7/12 उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत याशिवाय चारा छावणीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
अधिक माहितीसाठी माणदेशी फौंडेशन,माणदेशी चौक,म्हसवड येथे संपर्क साधण्याचे आवाहन माणदेशी फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे.