समता परिषदेच्या प. महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुखपदी प्रा.कविता म्हेत्रे यांची निवड

म्हसवड : समता परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी येथील प्रा. कविता म्हेत्रे यांची निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे पत्र समता परिषदेचे प्रमुख माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.
प्रा. कविता म्हेत्रे ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा म्हणुन कार्यरत असुन यंग्री यंग डँशींग उमन म्हणुन त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. आजवर राजकारणात काम करीत असताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातुन विविध पदावर काम करताना महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे व विरोधकांना घाम फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचा स्पीकर म्हणुनही त्यांना संबोधले जाते, पक्षाचे प्रमुख पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माण तालुक्यात काम करताना दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यांनी पवार साहेबांच्याच सुचनेनुसार तालुक्यातील इंजबाव हे गाव दत्तक घेतले होते, तर म्हसवड नरपरिषदेत विरोधी पक्ष नेता म्हणुन काम करताना प्रा. म्हेत्रे यांनी माणगंगा पुर्नजिवन समितीच्या माध्यमातुन त्यांनी माणगंगा नदीची स्वच्छता करुन नदीपात्रा शेजारी शेकडो झाडे लावुन ती जगवण्यासाठी नागरीकांना आवाहन करुन झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला होता.
राष्ट्रवादी पक्षाने त्यांची काम करण्याची धमक पाहुनच त्यांची यापुर्वी सातारा डि.पी.डि.सी. साठी निवड केली होती या माध्यमातुन त्यांनी अनेक लोकोपयोगी सामाजीक कामे केली आहेत. तर म्हसवड सारख्या निमशहरी भागात खास बाब म्हणुन शासनाला क वर्ग नगरपालिका हद्दीत रोजगार हमीची कामे सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी पवारांकडे पाठपुरावा केल्याने रोजगार हमीची कामे या शहरात मार्गी लागुन अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. सामाजीक व राजकिय क्षेत्रात काम करताना प्रा.म्हेत्रे यांनी आपल्यातील कलेलाही वाव मिळवुन दिला असुन मी सावित्री बोलतेय या एकपात्री नाटकाचे प्रयोग त्या अवघ्या महाराष्ट्रभर आजही करीत आहेत.
एक प्राध्यापिका म्हणुन काम करताना त्यांनी लेखन, काव्य पंक्ति अनेक लिहल्या आहेत, त्यांनी अशा विविध पदावर काम करताना त्यांना विविध पुरस्काराने यापुर्वी सम्मानित करण्यात आले असुन आदर्श जिल्हा युवा पुरस्कार, आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, हुतात्मा गौरव पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, रेऊ कथा पुरस्कार, ओ.बी.सी.रत्न पुरस्कार आदी पुरस्काराने आजवर त्यांना गौरवण्यात आले आहे. प्रा. म्हेत्रे यांच्या सदर निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आ. प्रभाकर घार्गे, पंतप्रतिनिधी श्रीमंत गायत्रीदेवी, युवा नेते शेखर गोरे आदींनी अभिनंदन केले आहे.