Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीलखनऊमध्ये 1 मे ला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम

लखनऊमध्ये 1 मे ला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम

वडूज : मराठी समाज उत्तरप्रदेश या सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार दि. 1 मे रोजी उत्तरप्रदेशातील लखनऊ शहरात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होणार आहे. याकरीता संघटनेच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयेजन केले आहे.
लखनऊ येथील भातखंडे संगित संस्थानच्या केशरबाग येथील कला मंडप प्रेक्षागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर संयुक्त भाटीया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस भातखंडे विश्‍व विद्यालयाचे कुलपती प्राचार्य डॉ. श्रृती काटकर-सडोलीकर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील, कोषाध्यक्ष गजानन पाटील, लखनऊ शहरअध्यक्ष विवेक फडके, अनुराग नातू, दिनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी संघटनेच्या वतीने 2017 व 2018 मध्येही महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर संघटनेच्या वतीने दरवर्षी शिवजयंती, गणेशोत्सव हे धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपुर्ण उत्तरप्रदेशात विखुरलेल्या महाराष्ट्रीयन बांधवांना एकत्रित आणले जाते. तसेच मराठी लोकांचे छोटे-मोठे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या कार्यक्रमाचा फायदा होतो. असे यावेळी बोलताना श्री पाटील यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular