Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीदहा गावात विविध विकास कामांना 73 लाख रुपयाचा निधी मंजूरःराजेंद्र घाडगे

दहा गावात विविध विकास कामांना 73 लाख रुपयाचा निधी मंजूरःराजेंद्र घाडगे

मसूरः फत्यापुर तालुका सातारा गावचे सुपुत्र व जलसंधारण ओबीसी विकास मंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ग्राम विकास पंचायत राज विभागातून जिल्ह्यातील दहा गावात विविध विकास कामांना 73 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा राजकारण विरहित केलेल्या घाडगे यांच्या पाठवल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कराड तालुक्यातील किवळ, चिखली, हेळगाव, पाडळी, हजारमाची, कोपर्डे हवेली या गावातील अंतर्गत रस्ते कामी प्रत्येकी सात लाख रुपये तसेच काशीळ तालुका सातारा सातारा येथील स्मशानभुमी दुरुस्तीसाठी सात लाख रुपये नांदगाव आणि फत्यापुर येथे सभामंडपास साठी प्रत्येकी सात लाख रुपये कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकर ही विकास कामे मार्गी लागणार आहेत. यापूर्वी ही राजेंद्र घाडगे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे अनेक वर्षापासून तांडा वस्ती वाड्यांचा विकास करण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेतून जिल्ह्यातील टिटवेवाडी, अतीत, किरोली वाठार, नागझरी, अपशिंगे, नांदोशी, पळशी, चोराडे, लाडेगाव, पुसेसावळी या दहा गावात 85 लाखाचा निधी मिळवून देण्याबाबत त्यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. याशिवाय पवार वाडी तालुका खटाव येथे तलावासाठी 1कोटी 20 लाख फत्यापुर तालुका सातारा येथील दोन तलावासाठी 68 लाख खबालवाडी येथे तलावासाठी 36 लाखाचा निधी देण्यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावाही केला आहे. या कामामुळे संबंधित विभागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. घाडगे यांची जिल्ह्यातील अनेक गावातील विकास कामांना राजकारण विरहित सातत्याने सतत पाठपुरावा लाभला आहे. अनेक विकास कामे प्रत्यक्षात मार्गी लागले आहे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विविध विकास कामाबाबत घाडगे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही कामे मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular