मुख्यमंत्र्याच्या वतीने कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबियांना आ. शंभूराज देसाईंनी दिला 10 लाख रुपयांचा धनादेश

सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या 21 वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता आणि अत्यंसंस्कारादिवशी या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेशी दुरध्वनीवरुन घडलेली हकीकत सांगून आमदार शंभूराज देसाईंनी घेतलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केलेला 10 लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री यांचे वतीने आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते कै.रोहन तोडकर यांचे वडील दिलीप तोडकर यांना सुपुर्द करण्यात आला यावेळी पाटणचे तहसिदार रामहरी भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे हे उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता गेलेल्या रोहन तोडकर या 21 वर्षीय तरुणाचा झालेला मृत्यू या मृत्यूमुळे या विभागात त्यांचे पार्थिव चाफळ भागात आलेनंतर निर्माण झालेला तणाव तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच निवळला होता.त्यादिवशी त्यांनी तणावाच्या ठिकाणावरुनच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना घडलेली हकीकत सांगून मुख्यमंत्री यांचेकडून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन घेतलेमुळे तसेच या कुंटुबांला आर्थिक मदत मिळणेसंदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा तणाव निवळला होता.दरम्यान आमदार शंभूराज देसाईंनी यासंदर्भात तातडीने दुसरे दिवशी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देवून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देणेसंदर्भात लेखी पत्र दिले होते तसेच जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांनीही सदरचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे केला होता.आमदार शंभूराज देसाई यांचे पत्राचे अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे आदेशावरून सदर कुटुंबाला आर्थिक मदत देणेसंदर्भात विहीत नमुन्यातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात होत्या त्यानुसार पाटणचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचेकडून हा विहीत नमुन्यातील प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
सदरची मदत तातडीने या कुटुंबाला करणेकरीता आमदार शंभूराज देसाईंचा सातत्याने मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी या कुंटुबाकरीता दिलेल्या आश्वासनानुसार 10 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसिलदार रामहरी भोसले यांचेकडे पाठविला होता. तो धनादेश मुख्यमंत्री यांच्या वतीने आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते तहसिलदार रामहरी भोसले यांच्या उपस्थितीत कै.रोहन तोडकर यांचे वडील दिलीप तोडकर यांना देण्यात आला.