खा. उदयनराजे भोसले गटातील 11 जणांना तात्पुरता अटकपुर्व जामीन मंजूर

सातारा ः सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी खा. श्री. छ.  उदयनराजेे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण, रुपेश सपकाळ, विकी यादव, दीपक धडवई, युवराज शिंदे, सनी भोसले, विवेक जाधव, अमोल हदगे, अमर आवळे, सुजित आवळे, सनराज साबळे यांना उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) तात्पूरता अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (ता. 22) खासदार समर्थक यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज (मंगळवार) न्यायमुर्ती साधना जाधव यांच्या पूढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार समर्थकांना 7 फेब्रुवारीपर्यंत तात्पूरता अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली. खासदार समर्थक यांचेवतीने अशोक मुंदरगी व श्री शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.