Saturday, April 20, 2024
Homeकृषी‘हरीत दांडेघर’ संकल्पना कौतुकास्पद : मनिष भंडारी

‘हरीत दांडेघर’ संकल्पना कौतुकास्पद : मनिष भंडारी

भिलार : सर्वात जास्त पाऊस पडणार्‍या महाबळेश्‍वर -पाचगणीलाही अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा बसत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीवर तर पावसाच्या कमतरतेमुळे नागरीकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दांडेघर ग्रामस्थंानी पर्यटकांचे आकर्षन व गावचे देवस्थान असणार्‍या हॅरीसन फॉलीवर (थापा) वृक्षारोपण करून त्यांचे सगंोपन करीत र् हरीत दांडेघरचा केलेला संकल्प कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मनिष भंडारी यंानी केले.
दांडेघर (ता.महाबळेश्‍वर ) येथे हरीत दांडेघर या संकल्पाअंतर्गत गावाच्या देवस्थानात मोडणार्‍या थापा या पर्यटन पाँईंटवर विविध जातीच्या वृक्षांच्या लागवडी कार्यक्रम प्रसंगी श्री. भंडारी बोलत होते. यावेळी दांडेघरचे सरपंच शंकरराव कळंबे, माजी सरपंच जनार्दन कळंबे, सुभसष कासुर्डे ,अमोल कळंबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मनिष भंडारी पुढे म्हणाले ग्रामस्थंाची एकी व राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर कुठलीही योजना यशस्वी होते. आमदार मकरंद आबांच्या सहकार्याने नावाजलेले पुरातन तीर्थक्षेत्र असणार्‍या दांडेघरला पर्यटनाच्या दृष्टाने दर्जेदार बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. आमदार मकरंद पाटील यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील असा विश्‍वासही व्यक्त केला.
सरपंच शंकरराव कळंबे म्हणाले थापा या पर्यटनस्थळाला आणखी निसर्गरम्य करण्यासाठी ग्रामस्थ कटिबध्द असुन देवस्थानच्या जागांवर वृक्षारोपण करून त्या आणखी समृध्द करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. गावातील ग्रामस्थंाच्या एकीतुन आम्ही या विकासरथाला आणखी गती देणार आहोत,
जनार्दन कळंबे यंानी प्रास्ताविकात विविध विकास कामांची माहीती दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे परीसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमास सुभाष कासुर्डे, सचिन खरात, अशोक कासुर्डे, राजेंद्र कळंबे, सतीष वाडकर, भालचंद्र कळंबे, विजय कळंबे, जगन्नाथ कळंबे, गंगाराम कळंबे, केदार गुरव, नथुराम कळंबे, रमेश कळंबे, बाळासाहेब कळंबे, दत्ता कळंबे, अमीत कळंबे, अशुतोष वाडकर, ग्रामस्थ व महीला मोेठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत शंकरराव कळंबे यंानी केले तर अशोक कासुर्डे यंानी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular