वरोशी गावच्या शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात वासरू ठार

केळघरः वरोशी गावच्या शिवारात बिबटयाच्या हल्यात एक वासरू ( खोंड ) ठार झाले असून शिवारातील गुराख्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . शुक्रवार दि .10 रोजी वरोशी ( ता. जावली ) गावचे अशोक विठ्ल कासुर्डे हे नेहमीप्रमाणे आपल्या तीन गायी आणि तीन वासरांना घेऊन डोंगररांगात चरावयास घेऊन गेले होते .
यावेळी सायंकाळी इतरांच्या गुरांबरोबरच आपल्या गायी घरी आणताना त्यांच्या गायीचा तीन वर्षाचा खोंड गायब असल्याचे निदर्शनास आले . त्याचा शोध घेऊनही सापडला नाही . पुन्हा शनीवार ( दि. 11 ) रोजी दिवसभर शोध घेतला असता . गावच्या डोंगर माथ्यावरील घुबाडदरी नावाच्या शिवारात बिबटयाने अर्धवट खालेल्या अवस्थेतील खोडांचे शरीर आढळून आले आहे . हा हल्ला बिबटयानेच गेलयाचे निदर्शनास आले .
या शिवारात  वरोशी, नांदगणे , केळघर व कुरुळोशी गावची जनावरे गुराखी चरावयास नेत असतात. या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे गुराख्यामध्ये भितीचे वातावरण पसरले असून संबधित वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा . व नुकसान झालेल्या शेतकर्‍यांस नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .