आमलेवाडी येथील मंडळाच्या दिंडी सोहळ्याचे खटावमध्ये उत्साहात स्वागत …

खटाव : आमलेवाडी (ता. खटाव) येथील इंचगिरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने पंढरपुरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडी सोहळ्याचे खटाव मध्ये उत्साहात स्वागत करणेत आले.
खटावचे सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच बबराव घाडगे, मुगुटराव पवार आदि च्या हस्ते स्वागत करणेत आले. या वेळी खटाव मधील भाविकांचे वतीने तसेच ह.भ.प.ज्ञानेश्‍वर लावंड यांचे वतीने दिंडी सोहळ्याकरीता लाकडी घोडे अर्पण करण्यात आले. दिंडी चालक हणमंत महाराज मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी दर्शनासाठी भावीकांनी चावडी चौकामध्ये गर्दी केली होती. इंचगिरी साप्रंदाय मंडळ आमलेवाडी आणि पंचक्रोशीतून निघणार्‍या दिंडीमध्ये खटावसह परिसरातून ग्रामस्थांचा सहभाग असलेल्या दिंडी सोहळा जिल्ह्यातून जाणार्‍या प्रमुख दिंडी पैकी एक असल्यामुळे दर वर्षी पायी जाणार्‍या भाविकांची संख्याही दिवसेंनदिवस वाढत आहे.
या दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी चौकामध्ये स्वागत करण्यात आले. आपल्यापरीने सर्वच भाविक या दिंडी करीता सहकार्य करताना दिसून येत होते.