एबीआयटीतून उच्चतम दर्जाचे अभियंते घडतील : सौ. वेदांतिकाराजे भोसले

साताराः ग्रामीण भागातील गोर-गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टने शेंद्रे येथे अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निक कॉलेज सुरु केले. आज या कॉलेजचा 10 वा वर्धापनदिन साजरा होत असून गेल्या 10 वर्षात 3 हजार 880 इंजिनियर या कॉलेजने घडवले असून नेहमीच उच्चतम दर्जाचे अभियंते या कॉलेजमधून निर्माण होतील, असा विश्‍वास ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला.
एबीआयटी कॉलेजच्या 10 व्या वर्धापनदिनानिमीत्त कॉलेजच्यावतीने वृक्षारोपन, आरोग्य तपासणी शिबीर आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य एस. यू. धुमाळ, उपप्राचार्य एस.एस. भोसले, आर. ए. माने, आर. आर. खंडाळे, आय.टी.आय.चे प्राचार्य व्ही. एच. मोहिते, डी.एस. जाधव, आर. ए. निकम, बी.एस. पाटील आदी शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. समुपदेशक, कुंडलीक पाटील आणि सविता सावंत यांनी आपले आरोग्य या विषयावर व्याख्यान सादर केले.
कॉलेजमध्ये सर्वसोयीनीयुक्त सुसज्ज लॅब आणि ग्रंथालय, अद्यावत संगणक कक्ष, आधुनिक मशिनरीने सुसज्ज असलेले वर्कशॉप, वायफाय सुविधा, भव्य क्रिडांगण, अनुभवी एम.ई., एम.टेक शिक्षक वर्ग तसेच सातारा, कराड, उंब्रज, तारळे, कोरेगाव, रहिमतपूर बससेवा अशा नानाविध सुविधा कॉलेजमधून पुरवल्या जातात. शिक्षणानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कॉलेजमार्फतच नामांकित कंपन्यांमध्ये जॉब इंटरव्ह्यूचे नियोजन केले जाते. आज अनेक विद्यार्थी एअरफोर्स, मर्चंट नेव्हीमध्ये रुजू आहेत. छेडा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. शिरवळ, पियाजो व्हेईकल प्रा. लि. बारामती, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स पुणे, सी करीयर मेरीटाईम सर्व्हिसेस गोवा, कूपर इंडस्ट्रीज सातारा, मॅग्ना स्टीअर प्रा. लि. पुणे (ऑस्ट्रेलिया बेसड), सुजलॉन पुणे, झेफयर सिस्टीम प्रा. लि. पुणे, जॉन डियर पुणे यासारख्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे. दरवर्षी विविध गुणदर्शन, क्रीडा स्पर्धा, व्यक्तीमत्व विकासासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. राज्यातील डिपेक्स स्पर्धेत प्रथम पारितोषीक पटकावून या कॉलेजने एक आदर्श निर्माण केला आहे. विविध मान्यवरांनी एक मॉडेल कॉलेज म्हणून या कॉलेजचा गौरव केला असून 2018 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीच आयटीआय आणि 11 वी सायन्स व कॉमर्स (इंग्लिश मेडियम) हे वर्ग सुरु करण्यात आले असून उज्वल यशाची परंपरा हे कॉलेज कायम ठेवेल असा विश्‍वास सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी व्यक्त केला.