स्टोलने नव्हे शिवशाहीच्या धडकेने महिलेचा मृत्यू

सातारा : जुना आरटीओ चौक कदम पेट्रोल पंपानजीक दुचाकीत स्टोल अडकून महिलेचा दि. 18 रोजी मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणातील खरे तथ्य आज पोलीस तपासात समोर आले. मयत सारिका अभिजीत देशमुख या महिलेचा मृत्यू शिवशाही  सातारा-बोरिवली बसने दुचाकीला धडक दिल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून स्पष्ट झाले.
या प्रकरणात शिवशाही चालक तानाजी राजाराम पाटील रा. बोरखळ याच्यावर  शाहु पुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 18 रोजी सारिका देशमुख या त्यांचा चुलत भाऊ सुनिल ही राजी साबळे याच्यासमवेत एका कार्यक्रमावरून उरकून घरी जात होत्या. हा अपघात गाडीच्या चाकात स्टोल अडकून झाल्याची नोंद पोलिसांनी स्टेशन डायरीला केली होती. मात्र मयत महिलेच्या नातेवाईकांनी शाहुपुरी पोलीस स्टेशनला येउन माहिती दिली. महिलेचा चुलत भाऊ सुनिल साबळे यांनी शिवशाही बसने ही धडक दिल्याचे सांगितले. कदम पेट्रोल पंप परिसरातील रस्त्याच्या कडेचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्या आधारे सातारा बोरिवलीचा  (चक- 47- ध2464 )चालक तानाजी राजाराम पाटील याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.