बेकायदेशीर होर्डींग आढळून आल्यास कारवाई करणार – जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल

सातारा : सु-स्वराज्य फांऊडेशन व इतर यांनी PIL.155/2011 उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली होती. त्या याचीकेमध्ये त्यांनी सर्वसाधारणपणे बेकायदेशीर आकाश चिन्हे (sky singns), होर्डींग, बॅनर, पोस्टर, कमानी, मंडप, शामीयाने, जाहिरात इ. ज्या फुटपाथ, फुटवेज व रोड डियावडर, खांब, रस्ते तसेच सार्वजनिक व खाजगी जागेवर लावण्यात येतात. या बेकायदेशीर गोष्टी या राजकीय पक्षांचे पाठबळावर राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्त्यांकडून केल्या जातात. तसेच उपरोक्त प्रसिध्दीच्या गोष्टी ह्या प्रामुख्याने गणपती नवरात्री, दहीहंडी इ. उत्सवाचे वेळी घडतात. व यासाठी अनधिकृत स्टेज/मांडव, कमानी व शामीयाने उभारले जातात त्यासाठी आवश्यक त्या परवान्या घेतल्या जात नाहीत.
तसेच ट्रॉफिक आयलंडमध्ये जाहिराती केल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडथळे निर्माण होतात त्या अनुषंगाने त्यांना अवमान नोटिसा  देवूनही यामध्ये सुधारणा झालेली नाही. या घटना ह्या राजकीय पक्ष व त्यांचे  कार्यकर्त्यांना प्रतिबंध न केलेने घडतात. सबब अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून सदरची याचिका दाखल केली होती. सदर याचिकेचा निर्णय दि. 31 जानेवारी 2017 रोजी झालेला आहे. सदर याचिकेच्या निर्णयाप्रमाणे सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी प्राप्त अधिकारानुसार नोडल अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती केलेली आहे.
खाली नेमलेल्या नोडल अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेत व कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी, मालमत्तेवर व रस्त्यालगत जागेत असे फलक, बॅनर, पोस्टर इ. लावले असल्यास ते काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडल, अधिक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडल, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कृष्णानगर, अधिक्षक अभियंता, कोयना बांधकाम मंडल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग नियंत्रक, एस.टी, उप वनसंरक्षक अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सातारा, कराड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड, मुख्याधिकारी नगरपंचायत मलकापूर, लोणंद, कोरेगाव, खंडाळा, वडुज, दहिवडी, मेढा, पाटण, गट विकास अधिकारी पंचायत समिती, सातारा, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली, कराड, पाटण, जनरल मॅनेजर, बीएसएनएल, पोवई नाका, सातारा, वरीष्ठ पोस्टमास्तर, सातारा प्रशासन अधिकारी, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा, फौजदारी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा, उपविभागीय अधिकारी, फलटण, वाई, कोरेगाव, माण, कराड, पाटण, सातारा, तहसिलदार फलटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव, माण, खटाव, कराड, पाटण, सातारा, जावली.
वरील सर्व नोडल अधिकारी यांनी उच्च न्ययालयाच्या निर्णय व भारत निर्वाचन आयोगाकडील दि. 7 ऑक्टेांबर 2017 चे पत्र अत्यंत काळजीपुर्वक वाचन करुन बेकायदेशीरपणे लावलेली त्यांच्या कार्यक्षेत्रातील आकाश चिन्हे, होर्डींग, बॅनर, पोस्टर, कमानी, मंडप, शामीयाने, जाहिराती इ. काढणेबाबत कार्यवाही करावी. सबब त्यांनी त्याचे अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना योग्य त्या सूचना सत्वर निर्गत करणे बाबत सूचना दिलेल्या आहेत.
बेकायदेशीरपणे लावलेली आकाश चिन्हे, होर्डींग, बॉनर, पोस्टर, कमानी, मंडप, शामीयाने, जाहिराती इ. आढळून आल्यास नागरीकांनी नोडल अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी केले आहे.