दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आधार कार्डची सक्ती

परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरणे अनिवार्य
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
परीक्षा अर्जात आधार नंबर भरणे देखील बंधनकार करण्यात आले आहे. त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी आधार कार्ड महत्त्वाचे असणार आहे. आधार कार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही.
केंद्राने जून महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधार कार्ड, बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे. तुमचे एखाद्या बँकेत खाते असेत तर 31 डिसेंबर 2017 पर्यंत तुम्हाला आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावे लागेल. जर आधार क्रमांक संलग्न केला नाही तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बँकेत 50 हजारांपेक्षा जास्त जमा केल्यास लागेल मूळ ओळखपत्र
तुम्ही बँकेत 50 हजार त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यास जाल तेव्हा सोबत ओरिजिनल ओळखपत्र नक्कीच न्या. सरकारने मनी लाँडरिंग कायद्यात दुरुस्ती करून मूळ ओळखपत्र सक्तीचे केले आहे. आता बँक वित्तीय संस्थांचे कर्मचारी मोठी रक्कम जमा करणार्‍यांकडून आयकार्डची कॉपी घेतील. त्यावर लिहितील की मूळ ओळखपत्राशी ती पडताळून पाहिली आहे. ओळखपत्रात फसवेगिरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारने सांगितले.