अग्निजा एक आत्मकथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

साताराः दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा शाखा गोडोली आयोजित विनोदी वात्रटिका, काव्य, गंमतीका, कथाकथन व एकपात्री सादरीकरण आणि आसुही हसले खुदू..खुदू..खुदा..खुदा हा मकरंद गोंेधळी यांचा कार्यक्रम व डॉ. कृष्णराव कदम लिखिल अग्निजा एक आत्मकथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्व.श्री.छ.अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, गोडोली, विलासपूर सातारा येथे गुरूवार दि.16 मे 2019 सायं.5.30 वा. आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, साहित्यिक व विभागीय कार्यवाह मसाप पुणे रावसाबेब पवार तसेच शिरीष चिटणीस, पुणे शहर प्रतिनिधी, मसाप पुणे व मकरंद गोंधळी, सेवानिवृत्ती शिक्षण उपसंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विनायक भोसले, व्यवस्थापक गोडोली शाखाधिकारी अभिनंदन मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी सदर एकपात्री कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन सोहळयास समस्त सातारकर व गोडोली येथील रसिक श्रोते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस यांनी केले आहे.