सातारा शहरात विविध हिंदु संघटनांचे धरणे आंदोलन

सातारा- देशाचा विभाज्य भाग असणार्‍या काश्मीर मध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करा आणि भारतीय सैन्यांवर आक्रमण करणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी विविध हिंदु संघटनांचे वतीने आज रविवारी राजवाडा येथील गोलबागेसोर राष्ट्रीय हिंदु आंदोलन-धरणे सकाळी 11 ते दु.1 यावेळेत करण्यात आले.
यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे साधक डॉ. विरेंद्र तावडे यांना संशयित म्हणून अटक केले आहे. याप्रकरणी तपास हायकोर्टाच्या देखरेखेखाली चालू असून न्यायालयाने सुनावणीच्यावेळी तपासयंत्रणांवर तपासाच्या पध्दतीविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातनला अद्याप दोषी ठरवलेले नसताना काही राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना, तथाकथित नास्तीकवादी संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्यायकारक मागणी केली जात आहे. चौकशीच्या नावाखाली पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेला अशा प्रकारे गुंतवणे अयोग्य आहे. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने निपक्षपातीपणे चौकशी करावी तसेच सनातनच्या विरोधात नियबाह्य आंदोलने करून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या  संघटना आणि नेत्यांवर कठोर कारवाई करावी तसेच देशाच्या अखंडतेसाठी आंतकवाद्यांचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करावे सैन्यांवर अतिक्रमण करणारे, आंतकवाद्यांचे समर्थन करणारे आणि देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांना धाक  निर्माण होईल असे शासन करावे कारण काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बुर्‍हान वाणीच्या हत्येनंतरही अद्याप संपलेला नाही. तो भडकतच चालला आहे. आजपर्यत झालेल्या हिंसाचारात पाच हजार 800 मधील साडेतीन हजारपेक्षा जास्त भारतीय सैनिकच आहेत. काशिरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना जम्मू काश्मीर शासन काही करेल असे वाटत नाही. हा आंतकवाद निपटण्यासाठी भारतीय सैन्याला सर्वाधिकार प्रदान करावेत देशविरोधी घोषणा देणार्‍या मस्जिदीवरील भोंगे काढून तात्काळ काढून मशिदीवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात सनातन संस्था, विश्‍वहिंदु परिषद, हिंदु हासभा, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संस्था व संघटनाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.