Friday, April 26, 2024
Homeठळक घडामोडीअंदोरी गावात बिबट्या,परिसरातील शेतकरी व नागरिकांत घबराट

अंदोरी गावात बिबट्या,परिसरातील शेतकरी व नागरिकांत घबराट

अंदोरी : अंदोरी (ता. खंडाळा) येथील रूई नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी वसंत दगडे यांच्या उसाच्या शेतात सुमारे एक ते दीड वर्षाचा बिबट्या आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या आढळून आला नाही. अंदोरीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणार्या रूई नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चारचाकी वाहनातून जात असताना अंदोरीचे रहिवासी नानासाहेब ननावरे यांच्या समोरूनच बिबट्या रस्ता पार करून वसंत बबन दगडे यांच्या उसाच्या शेतात गेला. प्रसंगावधान राखून नानासाहेब ननावरे यांनी गाडी बंद करून बिबट्याचे मोबाईलवरून फोटो काढले. त्यानंतर काही मिनिटातच उसाच्या शेतात बिबट्या पसार झाला.
नानासाहेब ननावरे यांनी रूई व अंदोरी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली. अंदोरी गावात बिबट्या आढळून आल्याची माहिती खंडाळा वनविभागाचे वनक्षेत्रपाल ए.व्ही. शिंदे, वनपाल करपे, वनरक्षक प्रकाश गाढवे, वनमजूर धायगुडे, केसकर यांना मिळाली. त्यांनी सोमवारी सकाळी रूई येथे जाऊन बिबट्या दिसलेल्या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसमवेत हा परिसर पिंजून काढला.
मात्र बिबट्या आढळून आला नाही. याठिकाणी आढळून आलेल्या बिबट्याचे वय एक ते दीड वर्ष असून अन्नाच्या शोधात हा बिबट्या आपल्या इतर साथीदारांपासून दुरावला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरातील शेतकर्यांनी शेतात एकटे जाऊ नये, तसेच बिबट्या आढळून आल्यास त्वरीत वनविभागात कळवावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular