आशा वर्कर्सची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सातारा : सातारा आशा व गटप्रवतिक युनियन तर्फे आशा वर्कर्स यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातारा जिल्हा परिषदेसमोर आज आशा स्वयंसेविकांनी जोरदार निदर्शने केली.
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारीअधिकारी नितीन थाडे यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम कर्मचारी म्हणून घ्यावे. तोपर्यंत किमान वेतन म्हणून आशा 10 हजार रुपये व गटप्रवर्तकांना 18 हजार रुपये द्यावेत, आशाना बिना मोबदला अवांतर कामे सांगू नयेत. औषधांच्या किट्सचे पुर्नभरण करावे, रजिस्टर स्टेशनरी, बुकलेट मिळावीत, पीएचसीतून पल्स पोलीओची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करावी, आशांना मिटींगसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध व्हावा, गटप्रवर्तकांना पूर्वीप्रमाणे कंत्राटी कर्मचारी ऑर्डर मिळावी, मोबाईल बील 500 रुपये गटप्रवतकांना मिळावे तसेच प्रत्येकीला कॉम्प्युटर मिळावा, त्यांच्या कार्ड रिचार्जसाठी एक हजार मासिक द्यावेत, गटप्रवर्तकांना झेरॉक्ससाठी एक हजार रुपये द्यावेत आदी मागण्यासाठी आशा स्वयंसेविका यांनी निदर्शने कली. यावेळी कॉ.आनंदी अवघडे, जयश्री काळभोर, अर्चना चौगुले, नंदा पवार, कविता खामकर, चैताली निपाणे आदी उपस्थित होते.