महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सातारा : महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा जिल्हा यांच्यावतीने आशा वर्कर्सनी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी आज सातारा जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करुन जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा व गटप्रर्वतक यांना इतर राज्यात मिळणार्‍या निश्‍चित मानधनाच्या अभ्यास करुन त्याप्रमाणे महाराष्ट्रात आशांना 10 हजार रुपये व गटप्रवर्तक यांना 15 हजार रुपये निश्‍चित मानधन सुरु करावे, 10 प्रकारची रजिस्टरे स्वखर्चाने विकत घेवून कर्जबाजारी होणार्‍या आशांना 10 प्रकारची रजिष्टरे मोफत छापून द्यावीत तसेच स्टेशनरी व झेरॉक्ससाठी प्रतिमहिना 200 रुपये द्यावेत, गटप्रवर्तक यांना ऑनलाईन रिपोटींगसाठी लॅपटॉप व नेट कनेक्शन द्यावे, त्यांच्या मासिक खर्चासाठी 600 रुपये सादील मंजूर करावे, आशा व गट प्रवर्तक यांना विविध ट्रेनिंग, मिटींग यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर बोलविण्यात येते, त्यासाठी तालुकास्तरावर 200 रुपये व जिल्हा स्तरावर 300 रुपये भत्ता द्यावा, आरोग्य केंद्रात सोयीनीयुक्त आशा कक्षाची सुविधा द्यावी, जे. एस. वाय. केससाठी ए. पी. ए. धारक किंवा बी. पी. एल. धारक असे निकष न लावता केसप्रमाणे सर्वच केससाठी भत्ता द्यावा, आशा व गट प्रवर्तकांच्या कामाच्या ठिकाणी होणार्‍या पिळवणुकीसाठी दक्षता समिती स्थापन करावी, आशा व गट प्रवर्तकांना विना मोबदला कोणतेही काम लावू नका, आशा व गट प्रवर्तकांना तडकाफडकी सेवा समाप्ती बरखास्ती करु नये, सर्व प्रकारच्या औषधांचा समावेश असलेल्या किटसचे पुर्नभरण करावे, 14 व्या वित्त आयोगातू आशाना 6 हजार व गटप्रवर्तकांना 10 हजार वार्षिक सहातुग्रह अनुदान द्यावे, या मागण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ. आनंदी अवघडे, सीमा भोसले, राणी कुंभार, चित्रा झिरपे, वंदना सुतार, निर्मला कांबळे, शिला साळुंखे, सविता कांबळे, नसीमा मुलाणी, सुरेखा सीताफळे, वैशाली लोकरे, कल्याणी