Thursday, April 18, 2024
Homeताज्या घडामोडीऔंध,डिस्कळसह बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाड्यांचे वर्चस्व, निवडणूक निकालाने राष्ट्रवादीला दिलासा व धास्तीही

औंध,डिस्कळसह बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाड्यांचे वर्चस्व, निवडणूक निकालाने राष्ट्रवादीला दिलासा व धास्तीही

वडूज : खटाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये औंध,डिस्कळ, पडळ, यलमरवाडी या चार ठिकाणी सत्ताधारी आघाड्यांनी आपले वर्चस्व कायम राखले. औंध व डिस्कळ येथील निकालाने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. या दोन्ही ठिकाळी सर्वपक्षीय विरोधकांनी सत्ताधारी गटाला निकराची लढत दिली आहे. तर काही ग्रामपंचायतीत भाजपाचे सदस्य काही ठिकाणी निवडून आल्याने प्रस्थापितांना चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
औंध येथे राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखालील यमाई ग्रामविकास पॅनेलने सरपंचपदासह आठ जागा जिंकल्या आहेत. विरोधी जगदंबा परिवर्तन आघाडीला सहा तर एक जागा अपक्षाला मिळाली. सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली शैलेश मिठारे या 1 हजार 653 मतांनी विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी सर्वपक्षीय जगदंबा आघाडीच्या सौ. भाग्यरेखा नारायण गोसावी यांनी 1 हजार 587 मते मिळवून त्यांना निकराची झुंज दिली. अपक्ष शैला वसंत यादव यांना 346 मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी सदस्यपदी तानाजी इंगळे (332 मते),मिना जयवंत रणदिवे (345 मते), वंदना संतोष जायकर (316 मते), दशरथ विलास कुंभार (405 मते), वसंत लक्ष्मण पवार (344 मते), मिनाक्षी संजय भोसले (339 मते), सागर हणमंत जगदाळे (287 मते), ज्योती संदिप जाधव (434 मते), शितल गणेश देशमुख (372 मते), अनिल विलास माने (461 मते), शुभांगी वैभव हरीदास ( 462 मते), वहिदा वहिद मुल्ला (504 मते), सोमनाथ नारायण जाधव (382 मते), दिपक हणमंत नलवडे (422 मते), नेहा सुधिर फडणीस (393 मते) यांची निवड झाली.
डिस्कळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. महेश पवार हे 999 मते मिळवून विजयी झाले. याठिकाणी सदस्यपदी लता अविनाश कर्णे, मोनाली श्रीकांत घाडगे, रत्नाबाई बापू जाधव, संदिप महादेव कर्णे, लक्ष्मी वसंत जाधव, विठ्ठल कुंडलीक मदने, वनिता निवास कुंभार, अनिता ज्ञानदेव घाडगे, रामचंद्र नागू कर्णे हे उमेदवार बहुमतांनी निवडून आले. तर सचिन भिकाजी माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या आहेत. तर विरोधी सर्वपक्षीय आघाडीला चार जागा मिळाल्या.
यलमरवाडी येथे शिष्याची जोडी सरस
यलमरवाडी येथे विद्यमान सरपंच प्रसाद बागल व माजी उपसरपंच शरद बागल या शिष्यांच्या जोड गोळीने गुरूंना निवडणूकीत पराभवाची धूळ चारली. याठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखालील ब्रम्हचैतन्य पॅनेलने सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या. तर विरोधी परिवर्तन आघाडीस एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी पोपट सावळाराम शिंगाडे हे विजयी झाले. तर सदस्यपदी शामराव तात्या दुबळे, छाया बापूराव शिंगाडे, चित्रा गुपेंद्र बागल, रोहीदास सुखदेव शिंगाडे, पूनम रविंद्र बागल यांची निवड झाली. तर विठ्ठल साहेबराव बागल, भारती राजेंद्र बागल यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
पडळला पैलवानासह सभापतींना धोबी पछाड
पडळ येथे सरपंचपदासह सहा जागा जिंकून भाजपा व मित्र पक्षाच्या आघाडीने वर्चस्व मिळविले. याठिकाणी सरपंचपदी मनिषा चेतन सानप यांची बहुमताने निवड झाली. तर सदस्यपदी जयेंद्र गोविंद सानप, पल्लवी उद्धव जाधव, जनाबाई चंद्रकांत सानप, तानाजी शंकर सानप, रंजना पांडूरंग सानप, सिंधूताई बाळू सानप, शरद भगवान सानप, संगिता विजय सकट, संदेश श्रीपती वाघमारे यांची निवड झाली. तर पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर जोरदार तयारी केलेल्या पै. चंद्रकांत सानप व त्यांचे वस्ताद बाजार समितीचे सभापती रविंद्र सानप यांची विरोधकांसह मतदारांनी धोबीपछाड केली.पळसगाव येथे सोसायटीचे माजी अध्यक्ष सतिश घाडगे पाटील यांनी गलाई बांधवासह इतर धनिक शेठजींची रसद घेत अनेक वर्षांनंतर परिवर्तन घडविले. याठिकाणी सरपंचपदी जनार्दन गणपत मोहिते यांची निवड झाली. तर सदस्यपदी आकाश अरूण खरात, सोनाली नारायण काळेल, सवित्रा दत्तात्रय कळसाईत, रेखा सुगंध घाडगे, धोंडीराम नथुराम फडतरे, सोनाली जयवंत घाडगे यांची निवड झाली. नारायण सुभाष काळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. अनपटवाडी येथे एका जागेची निवडणूक झाली त्याठिकाणी सचिन सुरेश जाधव हे बहुमताने निवडून आले. तर सरपंचपदी वंदना गिरी, सदस्यपदी अंजना भोसले, कौसल्या घाडगे, नामदेव भोसले, कोमल निकम यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular