28 ऑक्टोबर हा आयुर्वेद दिवस

सातारा:  धन्वंतरी जयंतीच्या दिवशी  दि. 28 ऑक्टोबर रोजी पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येणार आहे.  यावेळी मधुमेह प्रतिबंधात्मक व नियंत्रनात्मक उपाय या विषयावर विविध कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, महाविद्यालये,  वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालये, खासगी आरोग्य संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजत केला जाणार आहे. या कार्यक्रमात शासकीय आयुर्वेद  वैद्यकीय अधिकारी, खासगी आयुर्वेदीक वैद्यकीय व्यावसायीक, आरोग्य कर्मचारी यांच्या बैठका घेऊन तज्ञांमार्फत जनतेला मधुमेहासंदर्भात जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे.
तसेच एनसीडी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत मधुमेह रुग्ण तपासणी व उपचार केंद्राची स्थापना केली आहे. जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आयुष विभाग कार्यरत असून डॉ. सौ. संजीवनी शिंदे व डॉ. राहून माने हे आयुर्वेदीक वैद्यकीय अधिकारी मधुमेह रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दादा सोनवणे व जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.