Wednesday, April 17, 2024
Homeठळक घडामोडीलाखोंच्या उपस्थितीत झाला बहुजन क्रांती मोर्चा

लाखोंच्या उपस्थितीत झाला बहुजन क्रांती मोर्चा

सातारा : संविधानाच्या सन्मानार्थ  आज  सातारा शहरातून रविवार दि. 15 जानेवारी रोजी भव्य  असा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.  या  3 तास चालेल्या मोर्चात  जिल्ह्यातील लाखो  नागरिक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील न भुतो न भविष्यति असा हा मोर्चा झाला  असल्याची माहिती अशोक गायकवाड, माजी आ. लक्ष्मण माने, पार्थ पोळके, रामदास कांबळे व पदाधिकार्‍यांनी दिली.
ते म्हणाले, सर्व  संघटना व पदाधिकार्‍यांमधील तात्विक मतभेद बाजूला सारून संविधानाच्या सन्मानार्थ बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. बहुजन समाजातील अनु. जाती, जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी, मराठा, बलुतेदार, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध लिंगायत, शीख, जैन अन्य समूहातील लोक यामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चात अमर गायकवाड, स्मृती इराणी, विजय गायकवाड, फारुक पटणी, आयेशा पटणी, दादा ओहाळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर रविवारी सकाळी 12 वाजता शाहू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देऊन मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी कोपर्डी येथील घटनेतील दुर्देवी मुलीला श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.कमानी हौद, राजपथ, मोती चौक, राजवाडा, राधिका टॉकीज, राधिका रस्ता, एसटी स्टँड, तहसील कार्यालय, पोवईनाका असा हा मोर्चा काढण्यात आला.
 मोर्चा पोवईनाका येथे आल्यावर श्री. छ. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ंण करण्यात आला.  या मोर्चाचे नेतृत्व सामील होणारे नागरिक  व बहुजन समाज  यांनी केले. मूक मोर्चा नसून हा बोलका मोर्चा असल्याने मोर्चाच्या वेळी मोठी घोषणा बाजी करण्यात आली.
 अ‍ॅट्रासिीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय व यंत्रणा उभी करावी, महिलांवरील अत्याचार निवारणाचे कायदे अधिक कडक करण्यात यावेत. कोपर्डी तसेच यापुर्वी व त्यानंतर घडलेल्या अश्या घटनांतील आरोपींना फासशीची शिक्षा देण्यात यावी, बारा बलुतेदार समाजाच्या हक्काची अंमलबजावणी करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करण्यात यावे, मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षाणाला धक्का न लावता त्यांच्या संख्येंच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे ओबीसीसह सर्व जातींची जाती निहाय जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात घटनेतील तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे. आबेीसी एनटी, बीएनटी, व्हीजे एनटी, एसबीसी, एसी, एसटी, मुस्लीम खिश्‍चन, बौध्द शीख, जैन लिगायंत, शिवधर्मिय संरक्षणासाठी सांप्रदायिक हिंसाचार  प्रतिबिंधक कायदा निर्माण कणर्‍यात यावा. कौळी व आदीवासी समाजाचा जत प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, आदीवासींचे विकाससाठी संविधानातील पाचवी व सहावी अनुसूची लागू करण्यात यावी  मुस्लीम समाजाला  सच्चर समितीच्या शिफारशी लागू करुन त्यांच्या संख्येच्या प्रमणाता प्रतिनिधीत्व द्यावे, समान नागरी कायदा हा केवळ मुस्लीमांच्या जिवराधात नसुन बुधद्ीस्ट , ख्रिश्‍चन, जैन, लिंगायत, ादीवासी यांच्या पर्सनल लॉमध्ये हस्तैक्षप आहे तो तसा कायदा करु नये. सन 2005 पासुन बंद करण्यात आलेली जुनी निव्तीत वेतन योजना पुर्ववत लागू करुन  कायम करावी अदी मागण्यांचे निवेदन 5 मुलींच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
या मोर्चामध्ये लाखो नागरिक सहभागी झाल्याने महाराष्ट्राला दिशा देणारा हा मोर्चा असल्याचे सर्वत्र चर्चा होती.  मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. मोर्चा मार्गावर प्रमुख चौकात वाहतुक दुसर्‍या बाजूने वळवण्यात आली होती. एसटी वाहतूकीवर याचा मोटठा परिणाम झाला. या मोर्चाला मागर्ंदर्शन करण्यासाठी  पोवई नाका येथे मचाण करण्यात आले होते. यावेळी विविध संघटनेच्या नेत्यांनंी आपली मनोगते व्यक्त केली. मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी मोर्चा मार्गावर समता सैनिक दलाचे 200 सैनिक  तसेच 500 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. डोक्याला निळे फेटे बांधुन व हातात निळे झेंडे घेतेलेले शेकडो दुचाकी स्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अश्या घोषणा देत मोर्चा मार्गावर  वातावरण निर्मिती करत होते. तसेच एकच पर्व बहुजन पर्व .. अश्या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले होते. मोर्चाचे वेळी घोड्यावरुन आलेले देव मल्हारी तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशूभषा केलेल्या व्यक्तीरेखा विशेष लक्षवेधी ठरत होत्या.  मोर्चाकाळात अनुचीत प्रसंग घडू नये यासाठी शहरवासीयांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते त्यामुळे अनेक बाजार पेठेतील मुख्य रस्ते बंद दुकानामुळे  ओस पडले होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular