बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सातारा : बैलगाडी- गाडा शर्यत जल्लीकट्टु (तामिळनाडू) वरील बंदी उठवून कायद्यात बदल करावा यासाठी कोल्हापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे असे निवेदन आज भारतीय राष्ट्रवादी पार्टी दिल्ली व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्याय संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
 जिल्हाधिकारी डॉ. आश्‍विन मुद्गल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडी शर्यतीवरील बंदी नियम, अटी लागू करून हटवावी. कायद्यात सुधारणा करून किंवा राष्ट्रपतींनी वटहुकुम जारी करून शर्यत चालू करावी. बैलगाडी शर्यतीला विरोध करणार्‍या पेटा व संबंधित प्राणी मित्र संघटनेवर कायमची बंदी घालावी.
या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत चालत बैलगाडी स्वत: ओढत दि. 15 ते 17 जुलै 16 या काळात लक्षवेधी आंदोलन संघटनेच्या मार्फत करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 18 जुलै या बेंदूर सणादिवशी मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा ईशाराही दिला आहे.
या प्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव, उदय घाडगे, सागर टेंभुगडे, भोपाल घाडगे, कृष्णा जाधव, शामराव तेवरे, सुनिल आवळे, वैशाली उंबरकर, वसंत अखले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
………………………..