यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने समाजकारणास प्राधान्य : आ. बाळासाहेब पाटील

मसूर : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबंाच्या विचारांची पाठराखन करून त्यांनी दिलेल्या शिकवणूकीतून समाजकारणास नेहमीच प्राधान्य देणेचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी अंतवडी ता.कराड येथे केले. अंतवडी ता.कराड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योनजनेतून पूर्ण झालेल्या शहापूर ते अंतवडी या रस्त्याचा उद्घाटन समारंभ आणि कोपर्डे हवेली जि.प.गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, या मतदार संघामध्ये सर्व गावांना समान न्यायाने निधी देवून चौफेर विकास करणेसाठी नेहमीच प्रयत्नशील असून, सध्या भाजप शिवसेना सरकारमुळे अधिकचा निधी देण्यास टाळाटाळ होत आहे. आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब या विभागाचे प्रतीनिधी होत,े त्यावेळी त्यंानी 20 वर्षे प्लॅनींग योजनेमध्ये शहापूर रिसवड अंतवडी या रस्त्याचा समावेश केला होता. या रस्त्यामुळे गावाला विशेष महत्व आले आहे, त्यानंतर आता या रस्त्यासाठी दर्जोन्नती करणेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये प्राधान्य क्रमाने निधी उपलब्ध केला, त्यामाध्यमातून रस्त्याच्या रूंदीकरणासह खडीकरण व डांगरीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात येत असून, या रस्त्यामुहे दळणवळणाची चांगली सोय निर्माण झाली आहे. या गावातील अनेक तरूण देशसेवेमध्ये  सहभागी असून, देशप्रमात अग्रेसर आहेत, यागावातील शहीद महादेव निकम हे कारगील युध्दामध्ये शहीद झाले आहेत, त्यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण या गावातील तरूण मडळांनी व ग्रामस्थांनी चांगल्या पध्दतीने केले आहे, तसेच या गावाला कुस्तीची चांगली परंपरा आहे, तसेच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर व पी.डी.पाटील साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे गाव आहे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वांना न्याय देणेसाठी प्रयत्नशील आहे. आरफळ डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या शुभारंभ प्रसंगी माननीय शरद पवार साहेब यांचेकडे आदरणीय पी.डी.पाटील साहेब यांनी कॅनॉलवरून लिफ्ट करून हणबरवाडी – धनगरवाडी उपसासिंचन योजनेची मागणी केली, त्यावेळपासून सातत्याने या योजनेचा आम्ही पाठपुरावा सुरू ठेवला आहे, त्यामधून अजितदादांचे माध्यमातून निधी उपलब्ध झाला त्यामुळे यायोजनांची कामे सुरू झाली. परंतू त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा निधी सध्या मिळत नसल्याने या योजनांची कांमे रखडली आहेत. राष्ट्रीय पेयजल या योजनांची कांमे रखडली आहेत, राष्ट्रीय पेयजल  योजनेतून यागावाला स्वच्छ व पूरेसे पाणी उपलब्ध करणेस प्राधान्य दिले असून ते ही काम मार्गी लागले आहे.यावेळी सुत्रसंचालन चक्रवर्ती शिंदे यांनी केले, प्रास्तावीक बापुराव शिंदे यांनी केले. यावेळी मेळाव्यास भिमराव इंगवले, नानासो पोळ, उत्तम माळी, रमेश चव्हाण, शरद बर्गे, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ उपसभापती सुहास बोराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आभार सुरज शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास कराड मार्केट कमिटीचे माजी सभापती दाजी पवार, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब सुर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण, सुधाकर रामुगडे, संदिप काटे, नेताजी चव्हाण, लालासाो चव्हाण,  मिथुन शिंदे यांचेसह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.