प्लॅस्टिकमुक्तीसाठी सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे: राजाभाऊ शेलार. ; पाटण हे केंद्र बिंदू असताना, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

पाटणः  प्लॅस्टिक मुक्ती करणे ही काळाची गरज आहे. प्रदुषण कमी होण्यासाठी प्लॅस्टिक सर्व सामान्य जनतेमधून हटवले पाहिजे. प्लॅस्टिकचे विघटण होत नाही त्यामुळे प्रदुषण वाढत आहे. सर्व लोकांनी एकत्र येऊन या अभियानात संघटीत होणे गरजेचे आहे. पाटण तालुका प्लॅस्टिक मुक्त करत असताना सर्व स्तरातून जनजागृती होणे महत्वाचे आहे. 239 ग्रामपंचायती आपल्या ला प्लॅस्टिक मुक्त करायचा आहेत. सामाजिक संस्था, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायती, अंगणवाड्या, शाळा या सर्व ठिकाणी आपण प्रबोधन करून त्यांना ही या अभियानात समाविष्ट करायचे आहे. सर्व प्रथम आपल्याला लोकांना प्लॅस्टिक वापराचे विपरीत परिणाम सांगून त्यांना प्लॅस्टिक वापरापासून परावृत्त केले पाहिजे. येत्या 20 नोव्हेंबर ला सोमवारी आपण पाटण मधून या अभियानाची सुरवात करणार आहे त्यावेळी प्रभातफेरी काढून तसेच पत्रके तयार करून लोकांनामध्ये या बद्दल जनजागृती करणार आहोत. पहिल्यांदा कचर्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गिकरण करणार आहे व त्यातील प्लॅस्टिक वेगळे करणार आहे. या सर्वांना एकत्रित करण्याचे काम ग्रामपंचायतींनी करायचे आहे त्याकरता ग्रामपंचायत सक्षम होणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 20 नोव्हेंबर ला या प्लॅस्टिक मुक्ती अभियानाचा शुभारंभ पाटण मधून करणार आहोत तरी पाटण मधील सर्व नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या चांगल्या उपक्रमास आपलाही सहभाग नोंदवावा. असे आवाहन प्लॅस्टिक मुक्ती अभियान अंतर्गत आज पंचायत समिती चा सभागृहात आज सभा घेण्यात आली त्यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केले.
यावेळी स्वागत गटविकास अधिकारी गायकवाड संजीव यांनी केले. त्यानंतर पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांनी पाटण नगरपंचायतीने चौदा व्या वित्त आयोगातून 52 लाख घनकचरा निर्मुलनासाठी प्लॅस्टिक चे विघटन करणारा प्रकल्प उभारणार आहे त्यासाठी आम्ही पाठपुरवठा करून हा प्रकल्प थोड्याच महिन्यात दिसून येईल तसेच आम्ही सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सभेत प्लॅस्टिकमुक्ती चा ठराव ही घेतला आहे. आम्ही पाटण मध्ये व्यापारी वर्ग व लोकांना याबाबत मनपरिवर्तन करू आणि पाटण प्लॅस्टिक मुक्त करू अशी माहिती दिली.  यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्ग पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती  राजाभाऊ शेलार, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी वाघ साहेब, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर, बबन कांबळे, नगरसेवक गणीभाई सातारकर, विजय टोळे, उमेश टोळे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. आभार प्रभारी गटविकास अधिकारी वाघ यांनी मांडले.
पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारीनीं फिरवली पाठ…
मिटींग ला मुख्याधिकारी अनुउपस्थित होते म्हणून उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी फोन केला असता, मी येऊ शकत नाही मला काम आहे अशी उत्तरे देऊन त्यांनी  मिटींग ला येण्यास नकार दिला. हे पाहून पाटण नगरपंचायतीचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि मुख्याधिकार्‍याना मिटींगला येण्यास वेळ नाही हे चुकीचे असून त्यांचा प्रतिनिधी ही सभागृहात उशीरा आला त्यामुळे राजाभाऊ शेलार यांनी खेद व्यक्त केला.