डॉ. राजेंद्र सरकाळे यांची बँकर्स इन्स्टीटयूट ऑफ रूरल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, लखनऊ येथील राष्ट्रीय चर्चासत्रास मार्गदर्शन करणेसाठी निवड 

साताराः बँकर्स इन्स्टीटयूट ऑफ रूरल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, लखनऊ यांनी अल्प मुदत सहकारी पतयंत्रणेमधील उत्तम कार्यप्रणाली या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 5 व 6 जानेवारी 2018 रोजी आयोजित केले आहे.  या चर्चासत्रामध्ये सातारा जिल्हा  मध्य.सह. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची सातारा जिल्हा मध्य . सह. बँकचे एन पी ए  व्यवस्थापन, ठेवी व कर्जे तसेच निधी व्यवस्थापन व बँकेचा व्यवसाय विकास याबाबत सादरीकरण करणार आहेत .
या चर्चासत्राकरिता संपुर्ण देशातून रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, नाबार्डचे चेअरमन व अधिकारी, अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्य सहकारी व जिल्हा मध्य . सह . बँकांचे पदाधिकारी व अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत .
डॉ ़ सरकाळे यांनी सप्टेंबर 2016 मध्ये रोम, इटली या ठिकाणी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मायक्रोफायनान्स व आर्थिक समावेशीकरण अंतर्गत आयोजित केलेल्या सेमीनारमध्येही मार्गदर्शन केले आहे .
डॉ ़ राजेंद्र सरकाळे यांची या चर्चासत्रास मार्गदर्शन करणेसाठी निवड झालेबद्दल बँकेचे अध्यक्ष आ..श्री. छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र विधान परिषद सभापती व बँकेचे संचालक ऩा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील (माजी खासदार), आ.शशिकांत शिंदे (माजी जलसंपदा मंत्री), माजी आ.विलासराव पाटील (माजी सहकार मंत्री) आ.प्रभाकर घार्गे, आ.बाळासाहेब पाटील, माजी आ.विक्रमसिंह पाटणकर (माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री), उपाध्यक्ष सुनिल माने, दादाराजे खर्डेकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा़ डॉ.महेश कदम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी व सेवक, गटसचिव, सहकार क्षेत्रातील आजी-माजी, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .