Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीभारतीय संस्कृती जतन करण्यात स्त्रीयांचा वाटा मोलाचाः सौ. वेदांतिकाराजे भोसले

भारतीय संस्कृती जतन करण्यात स्त्रीयांचा वाटा मोलाचाः सौ. वेदांतिकाराजे भोसले

साताराः जगभरात आपल्या भारतीय संस्कृतीला फार मोठे स्थान आहे. सण आणि उत्सवांच्या अखंडीत परंपरेमुळे भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. आपली आदर्श संस्कृती टिकवणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. सण, उत्सवांमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण उत्साहाने सहभागी होत असतात. भारतीय संस्कृती जतन करण्यात स्त्रीयांचा वाटा मोलाचा असून प्रत्येक स्त्रीने स्वत:सह समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सुरुची निवासस्थानी आयोजित हळदी- कुंकू समारंभाप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर महिला, युवती यांच्यासह हजारो गृहिणींनी समारंभासाठी उपस्थिती लावल्याने सुरुची येथे तोबा गर्दी झाली होती.
सायंकाळी 5 वाजता सुरु होणारा हळदी- कुंकू समारंभ महिलांच्या उत्स्फुर्त उपस्थितीमुळे 4.30 वाजता सुरु झाला. चार वाजल्यापासूनच सुरुची येथे महिलांचे आगमन सुरु झाले. सुरुची येथे गुलाबपाणी सिंपडून महिलांचे स्वागत करण्यात येत होते. महिलांना फूल श्रीफळ, तीळ-गुळ आणि संक्रातीचे वाण देवून त्यांचे स्वागत झाले. स्वत: सौ. वेदांतिकाराजे यांनी महिलांना हळद- कुंकू लावून, तीळगुळ देवून मकरसंक्रांतीनिमीत्त शुभेच्छा दिल्या. सायंकाळी पाच वाजता महिलांची गर्दी वाढू लागली. सायंकाळी 6 नंतर तर महिलांच्या तोबा गर्दीमुळे सुरुचीवर महिलांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या. महिलांनी अतिशय शिस्तबध्दपणे समारंभ पार पाडला. महिलांच्या स्वयंशिस्तीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
तिळगुळ घ्या गोड बोला असे एकमेकींना म्हणत, हातातील तिळाची वडी एकमेकीच्या हातावर ठेवत महिलांनी मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत सण साजरा केला. सौ. वेदांतिकाराजे यांनी नेहमीप्रमाणे कोणताही भेदभाव न ठेवता समारंभात येणार्‍या प्रत्येक महिलेचे आपलेपणाने स्वागत केले. महिलांनी आपल्या घराबरोबर आपल्या परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक महिलेने पर्यावरण रक्षणासाठी तत्पर राहिले पाहिजे. मकरसंक्रांत हा खास महिलांचा सण आहे. या सणामुळे महिलांना एकत्र येवून संवाद साधता येतो. आज महिलांनी खूप मनमोकळेपणाणे आणि आपुलकीने हळदी- कुंकू समारंभ साजरा केला असून यापुढेही सर्व माता- भगिनींनी एकोप्याने राहून आपल्या संस्कृतीचे जतन आणि समाजाचे रक्षण करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
आज मोफत मधुमेह तपासणी शिबीर संपन्न
दरम्यान, कर्तव्य सोशल ग्रुप, अजिंक्य लायन्स क्लब आणि संजीवनी डायबेटीस क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 20 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हत्तीखाना शाळेत मोफत मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात लायन्स डॉ. विरेंद्र घड्याळे हे तपासणी आणि मार्गदर्शन करणार असून या शिबीरास सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह लायन्स बाळकृष्ण जाधव, लायन्स राजेंद्र मोहिते, लायन्स शिवाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular