Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीछेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक क्रियाशील

छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक क्रियाशील

भिलार: पाचगणी हे पर्यटनस्थळ व शैक्षणिक केंद्र असल्याने या ठिकाणी महीला सुरक्षेसाठी आपण विशेष लक्ष देणार आहे. या माध्यमातुन शाळा, महाविद्यालय, सार्वजनीक व गर्दीची ठिकाणे, बस स्थानक, पर्यटन स्थळंावर मुली व महीलंाची छेडछाड करणार्‍या सडकसंख्यांहरींवर पोलीसंाची करडी नजर रहाणार आहे. छेडछाड तसेच समाजात नाहक उपद्रव माजवणार्‍यांना तातडीने अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यासाठी दामीनी पथक आक्रमकपणे काम करणार असल्याची माहिती पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यंानी केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नागंरे-पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या विशेष सुचना व मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा व वाहतुक नियोजनाविषयी आयोजीत केलेल्या बैठकीत सपोनी. पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे, नगरसेविका सरोज कांबळे, रेखा कांबळे, सुनंदा गोळे, अजित कासुर्डे,महाबळेश्‍वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, सुनिल उंबरकर, दिपक कांबळे, किशोरभाई पुरोहीत, चंद्रकांत कासुर्डे,अंकुश मालुसरे, डॉ. भारती बोधे , नामदेव चोपडे, सुर्यकांत कासुर्डे  आदी मान्यवर उपस्थित होते.
सपोनी पवार पुढे म्हणाले दामिनी पथक महीलंाच्या सुरक्षीततेसाठी कटीबध्द असुन शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी सम व विषम तारखेला वाहणे पार्कींगच्या जागा निश्‍चीत केल्यास व व्यापार्‍यांनी आपली वाहने इतरत्र पार्क केल्यास पर्यटकांच्या वाहनासाठी आपण शिस्त लावण्यासाठी आपण नागरिकांच्या सहकार्यानेच शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करू.या बैठकीस व्यापारी, वाहतुक, पालीका कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक, महीला
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular