तिरंगा’ च्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

भुईंज : तिरंगा इंग्लिश स्कुल पाचवडच्या विद्यार्थ्यांची नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.  नेपाळ येथे झालेल्या कराटे स्पर्धेत पाकिस्तान, चीन, बांगलादेश, भूतान, नेपाळ, भारत आदी देशातील एक हजार खेळाडू सहभागी झालेले होते.
या स्पर्धेत श्‍लोक गणेश शिंदे, प्राची चंद्रकांत मस्के, आयुश सचिन पोळ व संकेत दशरथ पवार यांनी सुवर्ण पदक मिळवले तर प्रथमेश मारूती जगदाळे आणि कुणाल भाऊसो गुंजाळ यांनी रौप्यपदक पटकावले.
यापूर्वी याशाळेच्या विद्यार्थ्यांनी थायलंड, दिल्लीसह विविध ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले असून हाँगकाँग येथे होणार्‍या स्पर्धेसाठी काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार तसेच क्रिडा शिक्षक गणेश शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.