मेढा शहरातील विविध विकास कामांची आ शिवेंद्रसिहराजे यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन व उद्घाटन

मेढा/प्रतिनिधी :- मेढा नगरपंचायतीच्या वतीने व आ शिवेंद्रसिहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मेढा शहरातील दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ बुधवार दि ३० डिसेंबर रोजी सकाळी११ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी दिली

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, माजी उपसभापती चंद्रकांत देशमुख,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, बांधकाम सभापती वंदना सपकाळ, आरोग्य सभापती संजना सावंत,नगरसेवक नारायण देशमुख, विकास देशपांडे, सुनील तांबे,शशिकांत गुरव, दीपाली शिंदे, कल्पना जवळ,शुभांगी गोरे,सुनीता तांबे,उद्योजक विजय शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
नगराध्यक्ष शिंदे म्हणाले मेढा नगरात आ शिवेंद्रसिहराजे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा धडाका सुरू असून यापूर्वी अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत आता चांदणी चौक ते देशमुख आळी रस्ता व गटर, चांदणी चौक ते लक्ष्मी मंदिर रस्ता व गटर,चांदणी चौक ते कुंभारवाडा रस्ता,श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील साकव पूल व रस्ता,ओतारी घर ते तांबोळी घर बंदिस्त गटर,चंद्रमानगर मधील डांबरीकरण,गटार, स्ट्रीट लाईट,धबधबा रोड साकव पूल,आगुंडे घर ते धनावडे घर रस्ता, अहिल्यादेवी नगर मधील स्ट्रीट लाईट,प्रभाग क्र १७ मधील रस्ता आदी विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन आ शिवेंद्रसिहराजे यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत
प्रभाग क्र ४,प्रभाग क्र १६ मध्येही विकास कामांची भूमिपूजन होणार आहेत तसेच आ शिवेंद्रसिहराजे यांनी कुंभारवाडा येथील संत गोरोबा यांच्या मंदिरासाठी वैयक्तिक निधी देण्याचे आश्वासन दिले होते या गोरोबा मंदिराच्या कामासाठी साठ हजार रुपये देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला मेढा शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी केले आहे