Saturday, April 20, 2024
Homeठळक घडामोडीसातारा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यात राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना अभिवादन

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यात राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना अभिवादन

सातारा, दि.११ : सर्वसामान्य कुटूंबातील मुले, मुली यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे आध्य गुरू राष्ट्रपुरुष महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.सार्वजनिक सुट्टी असतानाही सातारा जिल्ह्यात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यानी समाधान व्यक्त केले.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, आपत्ती व्यवस्थापन समिती चे ताम्हाणे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.                                          सातारा जिल्ह्यातील नायगाव ता खंडाळा हे शिक्षण माता सविस्तर फुले व खटाव तालुक्यातील कडगुण हे महात्मा फुले यांचे मुळगाव असल्याने या जिल्ह्यात फुले दांपत्य यांना देवपेक्षा ही मानवी हक्क मिळवून देणारे समर्थांचे गुरू मानले जाते. ज्यांना महापुरुष व छत्रपती शिवराय, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्व पटले आहे, ते अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात कार्यरत आहेत. इतरांना आपला मुक्त दाता कोण? हेच माहित नसल्याने ते काल्पनिक देवालाच मोक्षदाता समजत आहेत, निदान त्यांच्या पुढच्या पिढीला फुले दांपत्याच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येईल. हे काम राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित जगताप,सुनिल फरांदे यांनी केली आहे.                                                        सातारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या फलटण, माण, सातारा, कोरेगाव, वाई, कराड, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यानी फुले दांपत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.फुले यांच्या कार्याची दखल सध्या सर्व समाज घेत असून त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा वडुज ता खटाव येथील काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेल खटाव तालुकाध्यक्ष दाऊद भाई मुल्ला, मनसे स्वयं रोजगार व रोजगार विभाग जिल्हा संघटक सुरज लोहार, आर पी आय चे कार्याध्यक्ष गणेश भोसले व मान्यवरांनी  व्यक्त केली. तसेच सातारा जिल्ह्यात शासनाच्या नियमांचे पालन करून महात्मा फुले जयंती साजरी केल्याबदल सर्वांचे आभार मानण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular