विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

वैष्णवी व विश्‍वराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सातारा : मैत्री ग्रुप मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे (सळवे), ता. पाटण येथील विद्यार्थी कु. वैष्णवी नथुराम पवार व कु. विश्‍वराज नथुराम पवार या बहिण, भावाचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
या निमित्त जि. प. प्राथमिक शाळा पाळोशी, तामिने, उधवणे, कारळे, रुवले, मराठवाडी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत कंपास पेटीचे वाटप करण्यात आले. दि मॉडर्न हायस्कूल ढेबेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नथुराम मारुती पवार यांच्यावतीने देण्यात आले. मैत्री ग्रुप तर्फे कु. वैष्णवी व कु. विश्‍वराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.