भा ज पा माण तालुकाध्यक्ष पदी शिंदे तर खटाव साठी चव्हाण यांची  निवड   

 

शिवाजीराव शिंदे , भाजप माण तालुकाध्यक्ष

सातारा दि २९ :  सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टी च्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यासाठी म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे व खटाव तालुक्यासाठी  येरळवाडीतील धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.

गेल्या डिसेंबर महिन्यात १६ मंडलांपैकी १० मंडल अध्यक्ष निवडी झाल्या.  कोरोना संकटाने  राहिलेल्या ६ पैकी ४ मंडल अध्यक्ष यांची निवड  भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष  विक्रम पावसकर यांनी दि १० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती , उर्वरित २ मंडल अध्यक्षपदी माण तालुक्यातील

म्हसवड येथील शिवाजीराव तुकाराम शिंदे  यांची माण तालुकाध्यक्ष पदी तर येरळ वाडी येथील धनंजय गोरखनाथ चव्हाण यांची खटाव तालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुळे जुन्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपली आहे , परंतु जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यात कार्यरत राहून आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पदाधिकाऱ्यांना करून द्यावा आणि पक्ष संघटन वाढवण्यास मदत करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री विक्रम पावसकर यांनी केले आहे.                                                       भाजप पक्ष वाढीसाठी अनुभवी दोन नेत्यांची निवड झाल्याने माण -खटाव तालुक्यात भाजपा मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांना सोबत घेऊन अध्यक्ष पदाची धुरा समर्थ पणे पार पाडण्यात येईल असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल त्यांचे भा ज पा  प्रदेश संघटन सरचिटणीस श्री विजय पुराणिक, खा श्री छ उदयनराजे भोसले , खा  रणजितसिह नाईक निंबाळकर, आ  जयकुमारजी गोरे,आ शिवेंद्रसिहराजे भोसले व

जिल्हाध्यक्ष श्री विक्रमजी पावसकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.