भाजप सातारा पालिकेत विरोधी गटात बसणार : पॅनेल प्रमुख दीपक पवार यांची माहिती

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संघर्षासाठी स्वतंत्र रणनिती ठरणार
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राजांच्या विरोधात सातारकर मतदारांनी भाजपचे सहा नगरसेवक स्वतंत्रपणे निवडून दिले. त्यामुळे शहराच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांशी कोणतीही तडजोड नकरता भारतीय जनता पार्टी पालिकेत स्वतंत्र विरोधी गट म्हणून कार्यरत राहणार असुन यापुढे सातारकरांसाठी व निष्प:क्ष कारभार घडावा याकरिता दबाव गट म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती पॅनेल प्रमुख दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, सातारा शहरात भाजपने कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसताना पहिल्यांदाच पॅनेल टाकून तब्बल सहा नगरसेवक निवडून आणले यावरुन सातार्‍यात भाजपला जनाधार निश्‍चित वाढला आहे हे स्पष्ट आहे. सातारकरांच्या या मतांचा कौल ग्राह्य मानून भाजपचा सहा नगरसेवकांचा गट स्वतंत्रपणे पालिकेच्या कारभारात विरोधी बाकावर बसणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रभाग क्र. 16, 17 व 2 येथून भाजपचे सहा नगरसेवक निवडुन आले यातच भाजपची राजकीय ताकद सातारा शहरात वाढत आहे. हे स्पष्ट होते. आणि भाजपच्या धनंजय जांभळे या उमेदवाराने एकूण 1800 मते घेतली. फुटका तलाव येथे प्रस्थापितांचे जबरदस्त आव्हान असताना, जांभळे यांनी निकराचा प्रचार करुन त्यांच्या दुप्पट मते मिळवत विजय श्री खेचून आणली. उपनगरांमध्ये भाजपच्या चार ते पाच सिटस्, 40 ते 50 मतांच्या फरकांनी पडल्या अन्यथा भाजप थिंक टँकच्या अंदाजानुसार किमान 10 नगरसेवक निवडुन येणे अपेक्षित होते. पण पहिल्याच प्रयत्नात भाजपने जो षटकार मारला त्यावरुन दोन्ही राजांच्या विरोधात जनमत तयार होवू लागले आहे. याचे ते चिन्ह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी राजकीय सभा घेतल्यामुळे याचा फायदा भाजपला निश्‍चित झाला. कराड मध्ये दिग्गज नेते व मोठी प्रचार यंत्रणा यामुळे तेथे नगराध्यक्षपद खेचुन आणण्यात यश आले. त्यातुलनेत सातार्‍यात कार्यकर्त्यांची मोठी आघाडी नव्हती. व वेळे आभावी प्रचार यंत्रणा सर्वच ठिकाणी पोहचू शकली नाही. प्रभाग क्र. 18 मध्ये भाजपचा मोठा मतदार असताना ही अपेक्षित मतदान होवू शकले नाही. या मागची कारणे निश्‍चितच शोधली जातील.
सातारा शहरासाठी नगरसेवकांचा स्वतंत्र गट राज्याकडे पाठपुरावा करुन निधीसाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दीपक पवार यांनी दिली