केडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात

केळघर : ग्रामीण भागातील युवकांनी पारंपारिक खेळाबरोबरचआपल्या कला- कौशल्यानुसार विविध खेळात प्राविण्य मिळवावे. मातीतील खेळाबरोबरच शरीर सौष्ठव सारख्या स्पधैत भाग घेत उज्वल यश संपादन करावे. अशा खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,  असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
केडंबे (ता.जावली) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी केडंबे व ईगल प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पधैचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे , टायगर ग्रुप पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सागर शिंदे, पंचायत समिती सदस्या कांताबाई सुतार, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, विकास ओंबळे, उद्योजक राजेंद्र धनावडे, दिपक पार्टे, सागर धनावडे, सुनिल देशमुख, अशोक पार्टे, सुनिल जाभंळे, संतोष कासुर्डे, विक्रम पवार, दिलीप आंग्रे, माजी सरपंच बंडूपंत ओंबळे, बाळासाहेब ओबंळे, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी नंदकुमार ओंबळे, सरपंच  वैशाली ओंबळे, उपसरपंच प्रकाश ओंबळे, चंद्रकांत ओंबळे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या स्पधैत प्रथम कमांक जॉन देवनूर, ब्दितीय क्रमांक अक्षय जाधव, तृतीय क्रमांक सोमनाथ देशमुख यांनी मिळविला. तर बेस्ट पोझर अक्षय चिकणे व बेस्ट इम्पूटर म्हणून सोमनाथ देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी पंच म्हणून महाराष्ट्र श्री अशोक चव्हाण, मनोज तपासे, राजेंद्र दादणे , सुनिल भोजने, शरद मोरे यांनी काम पाहिले . तर स्टेज मार्शल म्हणून संजय केसकर यांनी काम पाहिले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी, ईगल प्रतिष्ठान, भैरवनाथ गणेश मंडळ, बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले . प्रारंभी स्वागत विकास ओंबळे यांनी केले . तर आभार बाळासाहेब ओंबळे यांनी मानले.