औंध बॉक्सिंग स्पर्धेत सातारचा संघ अजिंक्य ; रत्नागिरी ठरला उपविजेता 

औंध: औंध येथील श्रीयमाईदेवी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या विभागीय बाँक्सिंग स्पर्धेमध्ये सातार्‍याने विजेतेपद मिळविले. दोन दिवस चाललेल्या बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, प्रभाकर घार्गे,पोलीस अधिक्षक विजय पवार, संयोजक अमर देशमुख, सपोनि सुनील जाधव हणमंत शिंदे, राजेंद्र माने, नवल थोरात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
उपविजेतेपद रत्नागिरीने तर सांगली व कोल्हापूरने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये सुवर्णपदक पार्थ शिंगटे, दत्तात्रय गायकवाड, विजय क्षीरसागर, शुभम पवार, रोहन  जाधव, आशुतोष भारती, कुमार गंगावणे, दिपक काळेल, लियाकत मेनन, संकेत जाधव, हेमंत भालेकर, अब्दुल्ला मोदी, संतोष पवार, निरंजन माने, हर्षवर्धन फरांदे, दीप कांबळे तर मुलींमध्ये राणी गोसावी, माधुरी घोरपडे, कविता माळी, कोमल मदने, पुजा माने, श्रध्दा यादव, अनुजा सावंत, आर्या बारटक्के, स्वप्ना चव्हाण, विशाखा मुळे, श्रूती घार्गे यांनी सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन अमर देशमुख, बाबा नांदुगडे, अमर यादव, शंभू देशमुख, हर्षद देशमुख, पिंटु कोळी यांनी केले तर पंच म्हणून योगेश मुंदडा, वैभव वानकर, गुफरान शेख, सौमित्र जाधव,दीपाली जगताप, महेंद्र गुजले, हणमंत जाधव, प्रताप गुजले, युवराज भारती यांनी काम पाहिले.