ठाणे ते मायणी एसटी गाडी औंधमार्गे सुरू ; औंध परिसरातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे एसटी विभागाचे आवाहन

औंध(वार्ताहर):-ठाणे ते मायणी ही एसटी गाडी औंधमार्गे सुरू झाली आहे अशी माहिती एसटी विभागाच्या वतीने देण्यात आली असून प्रवाशांनी यासेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी विभागाने केले आहे.

मागील एक आठवडयापासून ठाणे आगाराने पुणे,सातारा, रहिमतपूर, औंध,पुसेसावळी, वडगाव,चोराडे मार्गे मायणी अशी ही एसटी सुरू केली आहे. या एसटी गाडीमुळे मुंबई, पुणे येथून औंध व परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिक, चाकरमान्यांची सोय झाली आहे.
मायणी,पुसेसावळी ,औंधमार्गे ही एसटी गाडी सकाळी दहा वाजता सातारा मार्गे ठाणेकडे जाते तर सायंकाळी चारच्या सुमारास औंधमार्गे मायणीकडे मुक्कामास जाते तरी याएसटी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.