बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर……

सावधान करडी नजर कॅमेर्‍याची…. बॉम्बे रेस्टॉरंट चौक म्हणजे काळ्या बाजाराचे, लुटारूंचे, खुनांचे, चेन स्कॅचिंगचे स्थान बनले होते. रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणे असे अनेक प्रकार घडले होते रोज काही ना काही ऐकावयास मिळत असताना कोणी ही दाद घेईना पोलिस चौकीचा प्रस्ताव अनेक वर्ष धुळ खात पडला होता शेवटी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या. मग नगर पालिकेने चौकातील उड्डाण पुला खाली पोलिस चौकीला जागा दिली . चौकात लाईट नाही यावर उपाय काय असा प्रश्न निर्माण झाल्यावर विकास नगर येथील सामाजिक बांधिलकी जोपासत  दिलिप कांबळे यांनी लगेच चौकात विद्युत दिवे बसवून त्याच बरोबर त्या ठिकाणी चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवून चौकातील अनेक गुन्हेगारांच्या मुसक्याच आवळल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून चौकात एकही अनुचित प्रकार घडला नसून पुढील भागात चार कॅमेरे देणार असल्याचे ही आवर्जुन सांगितले आहे ..
( छाया : संजय कारंडे सातारा )