सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा… लुप्त पावलेली परंपरा शिवमावळ्यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु

पाटण:- ( शंकर मोहिते ) – पाटण महालाचा प्रमुख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुंदरगडावर (घेरादातेगड) शेकडो शिवमावळे अबालव्रुदांच्या उपस्थित विजयादशमी शाहीदसरा सिमोल्लघंन साजरा झाला. सुंदरगडावर श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र श्रीमंत याज्ञेसिंह पाटणकर यांच्या हस्ते “सुंदरगड” दुर्ग पुजन, ध्वज पुजन करुन गडावरुन ध्वज मिरवणूक काढण्यात आली. गडाच्या पश्चिम महाव्दाराच्या मंदिरातील गणपती, वीरहणुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, शस्त्रपूजन करुन शाही सिमोल्लघंण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि जय भवानी.. जय शिवाजी.. च्यां घोषणांनी किल्ले सुंदरगड दुमदुमून गेला.
किल्ले सुंदरगड हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला स्वराज्य निर्मितीतील एक हिस्सा आहे. छत्रपती शिव काळात गडावर सुरु असलेल्या रूढीपरंपरा धार्मिक सनवार हे उत्सव ब्रिटीश काळात लुप्त झाल्या होत्या. गडाचे गडसौदर्यं नाहीसे होत चालले होते. सह्याद्रीच्या घाट माथ्यावर असणारा हा किल्ला पुन्हा उर्जेत आवस्थेत येत असून किल्ल्यावरील लुप्त झालेले सनवार पुन्हा मोठ्या जोमाने सुरु झाले आहेत. याचाच एक भाग किल्ले सुंदरगडावरील विजयादशमी सिमोल्लघंन शाही दसरा किल्ले सुंदरगड संवर्धन समितेने चालू वर्षापासून सुरू केला आहे. या शाही दसऱ्यास श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र श्रीमंत याज्ञेसिंह पाटणकर श्रीमंत विजयसिंह (गोटू दादा) पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनोहर यादव सर, यसुफ हकिम सर यांनी शाही दसऱ्या संर्दभात आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपट संगितकार अतुल लोहार, अनिल बोधे यांनी शिवशाहीरी सादर केली. चंद्रहार निकम यांनी प्रस्ताविक केले. किल्ले सुंदरगड शाही दसरा सोहळ्यास राजाभाऊ काळे, यशवंतराव जगताप, सचिन कुंभार, नारायण डिगे, काशिन्नाथ विभुत्ते, शंकरराव कुंभार, महादेव खैरमोडे, शंकर मोहिते, अविनाश पराडकर, निलेश फुटाणे, अनिस चाऊस, आण्णा पाटणकर, राम सांळुखे, भालेकर गुरुजी, बाळासाहेब देवकांत यांच्यासह किल्ले सुंदरगड परिसरातील अबालव्रुद नागरीक छत्रपती शिवमावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.