प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या माउली चिकित्सा मंदिरात आयुर्वेद दिन उत्साहात

सातारा : येथील प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या वतीने शहरातील राधिका रोडवरील माउली चिकित्सा मंदिरात सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियांका पाटील  यांचे हस्ते धन्वंतरी पूजन आणि आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या माउली चिकीत्सा मंदिराचे संचालक वैद्य सुयोग दांडेकर यांचा फार मोलाचा वाटा आहे. गेली 20 वर्षे त्यांची अखंड सेवा सुरु आहे. आत्तापर्यंत या सेवेचा लाभ भारतासह परदेशातील लाखो रुग्णांनी घेतला आहे. यशस्वी नाद, नाड परीक्षण व जन्म तारखेनुसार प्रकृति हे त्याचे प्रमुख वैशिष्ठय मानले जाते.
 आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले की, संपुर्ण भारत देशात आज मधूमेह मुक्त करण्याच्या उद्देेशाने प्रथम आयुर्वेद दिन साजरा करण्यात  येत असला तरी हे काम गेली. अनेक वर्षें प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या माउली चिकीत्सा मंदिरात संपन्न होत आहे.
 यावेळी आपल्या शुभेच्छा देताना संदीप पाटील म्हणाले की, आज धन्वंतरी देवतेचे पुजन करण्याचा आज आम्हा उभयंतांना लाभ मिळाला. वैद्य दांडेकर यांची उपचार पध्दतीची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. त्यांना अशीच रुग्ण सेवा करण्याचे कामी धन्वंतरी देवता निश्‍चित आशिर्वाद देत राहील.
यावेळी प्रकृति आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या वतीने संचालक अरुण जाधव, संचालिका नेहा दांडेकर, रिसॉर्टचे कार्यकारी अधिकारी प्रमुख डॉ.संदिप व्हनवाडे, हेल्थ डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ.दिपाली व्हनवाडे, स्त्री रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. प्रियांका देसाई, डॉ. अनुराधा शिंदे, पुरुष रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ.मंगेश देसाई, चिफ अ‍ॅडमिनीस्ट्रेटर डॉ.बाबासाहेब शिंदे, निवासी डॉ.सिध्दनाथ कदम, साई माउली चिकीत्सा मंदिराच्या डॉ.निलम शिंगटे, डॉ. अनुजा काळे, डॉ.सुधाकर देठे, जिओ फ्रेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भालचंद्र महामुनी, सोनिया महामुनी, मधुमेही तज्ञ डॉ.उदय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 दरम्यान दि. 4 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2016 पर्यंत साई माउली चिकीत्सा मंदिर येथे मधूमेह रुग्णांसाठी मोफत रुग्ण तपासणी येथील मधुमेह तज्ञ वैद्य उदय पाटील करणार आहेत तरी या संधीचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन साई माउली तर्फे करण्यात आले आहे.