नागपुरचा शुभम लाकुडकर आणि सातारची ईशा कोळी राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत विजेते

सातारा : सोमवार आणि मंगळवार दि. 24 व 25 डिसेंबर रोजी समर्थ सदन, सातारा येथे थ्री- टू- वन चेस अकॅडेमि सातारा ने आयोजित केलेल्या 9 व्या थ्री टू वन राज्यस्तरीय खुल्या जलदगती बुद्धीबळ स्पर्धेचे खुला गट अजिंक्यपद व 19 वर्षाखालील ज्युनियर अजिंक्यपद नागपुरचा शुभम लाकुडकर आणि सातारची ईशा कोळी यांनी अनुक्रमे खुला गट अजिंक्यपद व 19 वर्षाखालील ज्युनियर गट अजिंक्यपद निर्विवाद वर्चस्व राखत जिंकले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत बेंगळुरू, रत्नागिरी, औरंगाबाद, वाई,कराड,सातारा, पुणे, मेढा, कोल्हापुर, जेजुरी, शिरवळ येथून एकूण 94 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये वयोवर्ष 6 ते 70 वर्षापर्यंतच्या खेळाडुंसह 37 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुख्य पाहुणे अरुण गोडबोले (जेष्ठ कर सल्लागार, साहित्यिक आणि प्रथितयश चित्रपट निर्माते), डॉ.रविंद्र भारती-झुटिंग (अध्यक्ष- सातारा शहर काँग्रेस कमिटी, माजी सभापती – सातारा नगरपरिषद सातारा), जयसिंह उथळे (अध्यक्ष-सातारा जिल्हा बुध्दीबळ संघटना) आणि स्पर्धा संयोजक थ्री टू वन चे प्रणव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच अ‍ॅड. प्रणव टंगसाळे, उद्धव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी थ्री- टू- वन चेस अकॅडेमि च्या आणि सातारा चेस फॅन क्लब च्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच अ‍ॅॅड.विनोद घाडगे यांनी सूत्र संचालन केले व आभार मानले. स्पर्धेतील गटनिहाय विजेते खालील प्रमाणे :
खुला गट: 1) शुभम लाकुडकर (नागपुर) 8.5 गुण – बक्षिस रु.5000 व चषक, 2) ओंकार कडव (सातारा) 8 गुण – बक्षिस रु.3000 व चषक, 3) अथर्व चव्हाण (कोल्हापुर) 7 गुण – बक्षिस रु.2000 व चषक, 4) अनिकेत बापट (सातारा) 6.5 गुण – बक्षिस रु.1100, 5) मंगेश चोरगे (वाई) 6.5 गुण- बक्षिस रु.700, 6) सिद्धेश यादव (सातारा) 6.5 गुण- बक्षिस रु.600, 7) प्रशांत मोहीते (सातारा) 6.5 गुण- बक्षिस रु.500, 8) वरद आठल्ये (कोल्हापुर) 6.5 गुण बक्षिस रु.500, 9) उमेश कुलकर्णी (सातारा) 6 गुण- बक्षिस रु.500, 10) यश पंढरपुरे (सातारा) 6 गुण- बक्षिस रु.500, 11) विनोद घाडगे (भरतगाव) 6 गुण- बक्षिस रु.400, 12) ओंकार पाटील (जेजुरी) 6 गुण- बक्षिस रु.400, 13) निशीत बलदवा(औरंगाबाद) 6 गुण- बक्षिस रु.400, 14) श्रेयस गुरसाळे (सातारा) 6 गुण- बक्षिस रु.400, 15) सुरज वैद्य (कोल्हापुर) 6 गुण- बक्षिस रु.400, सर्वोत्कृष्ट जेष्ठ खेळाडु – 1) श्री.शिरीष गोगटे (सातारा) 6 गुण,बक्षिस-रु.401 व चषक, सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडु – 1) सन्मित शहा (सातारा) 5.5 गुण ,बक्षिस – रु.401 व चषक, 19 वर्षाखालील ज्युनियर गट: 1) ईशा कोळी(सातारा) 7 गुण,बक्षिस- रु.1000 व चषक, 2) सोहम चाळके (कोल्हापुर) 6.5 गुण , बक्षिस – रु.700 व चषक, 3) आयुष शिंगटे (खडकी),6 .5 गुण , बक्षिस- रु.500 व चषक, 7 वर्षाखालील : 1) ऋतुराज पांचाळ (रत्नागिरी) 2) अर्णव कातीवले (सातारा), 3) श्रीयश रणदिवे (सातारा), 9 वर्षाखालील : 1) ध्रुव गांधी (सातारा), 2) जिया शेख (सातारा), 3) सावनी पंतमिराशी (बंगळुरू) 11 वर्षाखालील : 1) अथर्व ढाणे (सातारा), 2) ओम जंगम (सातारा), 3) ईशा शहा (सातारा), 13 वर्षाखालील : 1) ज्योतिरादित्य जाधव (सातारा), 2) अथर्व पंढरपुरे (सातारा), 3) वरद धाराशिवकर (सातारा), 15वर्षाखालील : 1) साहिल शेजाळ (सातारा), 2) असिम सय्यद (सातारा), 3) विवेक शिंदे (विरवडे), सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु – 1.चैत्राली जाधव (सातारा),5 गुण सर्वात जास्त सहभाग शाळा : सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कुल (शिरवळ) प्रोत्साहन पर बक्षिसे : 1. आशिष बारटक्के (सातारा), 2. विराज राजपुरोहित (शिरवळ).