चेतना सिन्हा यांचा महिला दिनानिमित्त नागरी सत्कार

म्हसवड:  म्हसवडकर नागरिकांनी माणदेशी महिला बँक स्थापने पासुन मदत केली नसती तर चेतना सिन्हा भाभी घडल्या नसत्या.तुम्ही गावकर्यानी साथ दिल्यामुळे भाभी एवढे मोठे कार्य करु शकल्या. असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या विश्वस्त  सुनंदाताई  पवार यांनी केले.
जागतिक महिला दिना निम्मित दावोस येथे नुकतीच जागतिक अर्थ परिषदेचे सह अध्यक्ष पद भुषविलेल्या या गांवच्या श्रीमती चेतना सिन्हा यांचा म्हसवडकर नागरीक वाला म्हसवड पालिकेच्यावतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्या प्रमुख म्हणुन त्या बोलत होत्या.
यावेळी सामाजिक अंकेक्षण संचालनालय महाराष्ट्र सदस्या सविता व्होरा, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर उपाध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने,विजय सिन्हा, नितिन दोशी, प्रा. कविता म्हेत्रे, नगरसेविका हिंदमालादेवी राजेमाने,सविता म्हेञे, सविता माने,कलावती पुकळे,शोभा लोखंडे, साळुबाई कोळेकर, मनिषा विरकर,वैशाली लोखंडे, नगरसेवक शहाजी लोखंडे, दिपक विरकर,डॉ.वसंत मासाळ,अकिल काझी, विकास गोंजारी, गणेश रसाळ,पालिका मुख्याधिकारी पंडित पाटिल,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, म्हसवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, प्रदिप तावरे, जगन्नाथ विरकर, किशोर सोनवणे, किरण कलढोणे, पृथ्वीराज राजेमाने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्याकी, माणतालुक्याने गत तीन वषाँत कात टाकलीय पावसाचे वाहुन जाणारे पाणी साठविण्याचे काम लोकसहभागातुन मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहे.यामध्ये चेतना सिन्हा यांचाही मोठा सहभाग आहे.
या वेळी सुनंदाताई पवार यानी चेतना भाभीचे कौतुक करताना म्हणाल्या आज जर तुम्ही म्हसवडकर नागरिकांनी बँक स्थापने पासुन मदत केली नसती तर चेतना भाभी घडल्या नसत्या.तुम्ही गावकर्यानी साथ दिल्यामुळे भाभी एवढे मोठे कायँ करु शकल्या.
सत्काराला उत्तर देताना चेतना सिन्हा म्हणाल्या आजचा सत्कार महान आहे आजवर खूप सत्कार झाले आपल्या मातीतल्या माणसांचा सत्कार मोलाचा व आनंदाचा आहे.मी माहेर मध्ये तिसरी मुलगी,मी जन्माला आले तेव्हा माझी आजी रडली होती. आपल्या गांवच्या नागरीकांचा सत्कार करावा यासाठी स्नेहल सुर्यवंशी व युवराज सुर्यवंशी दाम्पंत्याचे विशेष कौतुक केले.
सत्कारामुळे जबाबदारी वाढते.ज्या महिला जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुलेनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले म्हणून महाराष्ट्र पुढे आहे. माणदेशातील नागरीकांना दुष्काळी कामे अमानवीय कामे बंद झाली पाहिजेत. यासाठी दुष्काळ हटलातरच हि कामे थांबणार.यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली.व्यंकटेश माडगूळकर,गदीमाचे लेखन वाचले. गावाशी,तालुक्याशी ,देशाचा मला अभिमान आहे मी म्हसवडकर असल्याचा.माणदेशी उद्योजिकेच्यासाठी 100 कोटींचा फंड उभा करता आला हे जागतिक अर्थ परीषदेचे यश आहे. हा सत्कार माझा नाही म्हसवडकरांचा सत्कार आहे.
यावेळी प्रा.कविता म्हेत्रे,स्नेहल सुर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी प्रजापीता, शिक्षक संघ, समिती, शिवसेना,भाजपा,भोजलिंग ट्रेकसँ, राष्ट्रीय कॉग्रेस, सरकारमान्य धान्य दुकानदार संघटना, फोटोग्राफर ,व्यापारी, मेडिकल,  डॉक्टर,नगरपालिका , बालवाडी,अंगणवाडी, जिप शाळा, बचत गट, जयभिम मंडळ, आदी सामाजिक संघटनानी श्रीमती सिन्हा यांचा सत्कार केला.