छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशनच्या माध्यमातून तत्पर सेवा

पाटण :- छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चोवीस तास सात दिवस लोकांना आरोग्य सह सामाजिक सेवेतील तप्तर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाटण येथे छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशन विना शुल्क सभासद नोंदणी कार्यालयाचा शुभारंभ मंगळवार दि. २९ मे रोजी रक्तदान शिबीर आणि कातकरी, वडार समाजातील गरीब कुटुंबांना ब्लैंकेट वाटप करून करणार असुन या तप्तर सेवेचा लाभ पाटण तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फौंडेशनचे पाटण तालुका संघटक नितीन पिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशनच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार असुन या बरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन आणि शेती अवजारे, महिला सबलीकरण, जेष्ठ नागरिकांना सुविधा, त्याच बरोबर कला व क्रीडा, वृक्षसंवर्धन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. या साठी चोवीस तास हेल्प लाईन केंद्र सुरू राहणार आहे. तर नागरिकांच्या चोवीस तास सेवेसाठी युवकांची छत्रपती उदयनराजे फोर्स कार्यरत असणार आहे. या फौंडेशनचे सभासद नोंदणी कार्यालय शुभारंभ मंगळवार दि. २९ मे रोजी रणजितसिंह पाटणकर स्मारकाच्या समोर मार्केट यार्ड पाटण येथे सकाळी ११ वा. होत असून
पाटण तालुक्यातील जास्ती – जास्त नागरीकांनी विना शुल्क सभासद नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन फौंडेशनचे पाटण तालुका संघटक नितीन पिसाळ यांनी केले आहे.