Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीसोशल डिस्टन्स ठेवून नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे -: तहसीलदार शरद पाटील

सोशल डिस्टन्स ठेवून नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे -: तहसीलदार शरद पाटील

मेढा ( वार्ताहर ) – जावलीतुन कोरोना हद्दपार करण्यात यशस्वी ठरलेल्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेवून बाजारपेठेत येवून माल खरेदी करताना सोशल डिस्टन्स ठेवावे आणि प्रशासनास सहकार्य करावे अशी सूचना जावलीचे तहसिलदार शरद पाटील यांनी केली आहे.
संपूर्ण जावली तालुका मागील काही महिन्यापासून भितीच्या वातावरणात जगत होता. परंतु जावलीतील सहा कोरोना बाधित रुग्ण यांचा तपासणी रिपोर्ट निगेटिवआल्याने आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केलेल्या टिमवर्कमुळे चांगले यश प्राप्त होवून जावली कोरोनामुक्त झाली आणि मेढा तसेच इतर २५ गावांनाही कंटेनमेंट झोनमधून शिथिल करण्यात आले.त्यामुळे मेढा आणि परिसरातील नागरिकांना आत्ता कोठे बर वाटत आहे.
मेढा नगरीतील व्यापारी दुकाने , शेती औजारे , बि- बियाणे , कापड दुकाने, पालेभाज्या स्टॉल, फळांचे गाडे, तसेच विविध दुकाने चालु राहणार असल्याने माल खरेदी कामी विविध गावातील नागरीकांची पुन्हा एकदा वर्दळ चालू राहणार असून नागरिकांनी शिस्तीत , कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करून साहित्य खरेदी करावी अशी सुचना तहसिलदार शरद पाटील यांनी केली आहे. मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी मेढा बाजारपेठ सुरळीतपणे चालू रहावी याकरिता नियोजन करणे महत्वाचे ठरणार असून या बाजारपेठेवर स. पो. नी. निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा बाजारपेठ, वेण्णा चौक, मेढा -मोहाट पुल, मेढा – महाबळेश्वर रोड या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आत्ता आपण कोरोना मुक्त झालो आहोत याचा विसर कोणी पडू देवू नये , नागरीकांनी योग्य ती दक्षता घेवून कोरोनाचा शिरकाव होवू नये या करीता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि घरी व्यवस्थित रहावे अशी चर्चा नागरीकांतुन सुरू आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular