महाबळेश्‍वर बसस्थानकाची स्वच्छता युध्दपातळीवर

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी युद्धपातळीवर स्वच्छतामोहीम हाती घेतली असून या मोहिमेसाठी तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅन साठी शहरवासीयांनी सहकार्य करावे असे अवाहन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केले आहे स्वच्छ सर्वेक्षण 2018 या मोहिमेत स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक व्यापार्‍यांनी सहकार्य करावे असे अवाहन देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्रचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर मध्ये दररोज हजारो पर्यटक भेट देतात याच महाबळेश्वर ला वर्षाकाठी 15 ते 20 लाख पर्यटक भेटी देत असतात येणारे काही पर्यटक स्वताच्या वाहनाने येतात तर काही पर्यटक एसटी महामंडळ च्या बस ने महाबळेश्वर बसस्थानका मध्ये उतरतात परंतु बस स्थानकामधील परिसर फक्त आणि फक्त बसस्थानक परिसरच स्वच्छ असतो या परिसरातील पाहणी नगरपालिकेने केल्या नंतर या परिसरातील अंतर्गत भागांत बसस्थानक कर्मचारी यानी गेली दहा ते पंधरा वर्ष स्वच्छता मोहीम राबविण्यातच अली नाही असे दिसून आले आहे महाबळेश्वर पालिकेकडून सलग तीन दिवस बसस्थानक परिसरात ही मोहीम प्रामुख्याने राबविण्यात अली बस स्थानक परिसर हा शहराच्या मुख्य भागामध्ये येत असून हा अंदाजे दोन ते तीन एकर मध्ये पसरलेला आहे पुढे बस स्थानक तर मागील बाजूस बस डेपो असून बसस्थानक मधील अंतर्गत भागांत वाढलेली झाडे झूडपे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॉटल प्लॅस्टिक पिशव्या याचा खच साठलेला होता पालिकेने तीन दिवस सफाई कामगार लावून या परिसरातून गेली दहा ते पंधरा वर्षाचा कचरा प्लॅस्टिक पिशव्या दोनशेहून अधिक व जेथे  एस टी बस धुतल्या जातात या परिसरातील  प्लॅस्टिक कचरा डंपर लावून जे सीबीच्या साहय्याने काढण्यात आला यामुळे बसस्थानक परिसर सुंदर व स्वच्छ झाल्या मुळे स्थानिक नागरिकामधून नगरपालिकेचे कौतुक होऊ लागले आहे
महाबळेश्वर बस स्थानक परिसरांत झाडलोट करणारे एसटी महामंडळाने कर्मचार्‍याची संख्या वाढवली आहे नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामुळे पंधरा वर्षापासूनचा 15 टन कचरा गोळा करण्यात आला आहे व नगरालिकेच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरांत जवळ पास दहा वर्षानंतर रंगरंगोटीचे काम चालू करण्यात आले स्वच्छता मोहिम मुळेच नगरपालिकेकडून बसस्थानक परिसर  बस डेपो झाल्या पासून आज पहिल्यांदाच स्वच्छ करण्यात आले आहे यामुळे शहरातून व पर्यटकामधून महाबळेश्वर च्या स्वच्छतेचे कौतुक होऊ लागले आहे .