मायणी व परिसरात थंडीचा तडाखा वाढला

मायणी :- (सतीश डोंगरे मायणी) मायणी व परिसरात कडाक्याची थंडी पडत असून,तापमान कमालीचे खाली सरकत आहे .यामुळे रात्री सर्वत्र लवकर शुकशुकाट होत असून लोकांचे सकाळचे कामकाजही उशिरा सुरू होत आहे . सकाळी भल्या पहाटे शैक्षणिक क्लासेस ला जाणारे विद्यार्थी क्लासेस बाहेरच शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करतांना दिसून येत आहेत.
‎ या हंगामातील हरभरा,गहू या पिकांसह अन्य फळांना या थंडीचे वातावरण आवश्यक आणि पोषक असे आहे . लोक रात्री कडाक्याच्या थंडीत ठिकठिकाणी शेकोट्या पेटवुन मध्यरात्रीपर्यंत गप्पागोष्टी करीत आहेत.सकाळी शाळां ,कॉलेज यांची सुरुवात साडेसात वाजता होत असते यासाठी पंचक्रोशीतील मायणी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना भल्या पहाटे उठून बस पकडून मायणी येथे शिक्षण घेण्यास यावे लागते. त्यामुळे सकाळी कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरलेले विद्यार्थी रस्त्याने शाळा कॉलेज कडे जाताना दिसतात.