काल कारीमध्ये 2 कोरोना बाधित रुग्ण तर चाळकेवाडीतही कोरोनाचा शिरकाव

परळी :- कारी गावात कोरोना ने शिरकाव केला आहे यामुळे सात वाद्यांसह असलेल्या काही गावाची धाकधूक वाढली आहे सापडलेले कोरोना बाधित रुग्णांची ट्रॅव्हलिंग हिस्टरी आहे चार माणसांचे कुटुंब विक्रोळी मुंबई येथून गावात दाखल झाले दोन-चार दिवसातच रुग्णालयात दाखल झाले असा प्रकार झाला आहे.
18 मे रोजी आई-वडील व दोन मुले खाजगी वाहन करून कारी गावात आले दोन दिवसात त्यांना त्रास सुरू झाल्याने ठोसेघर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मानसी पाटील यांनी दाखल करून घेतले व तिथून एका वेळी दोघांना वडील व त्यांच्या मुलाला जास्त त्रास झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले 26 मे रोजी रविवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह सोमवारी सकाळी प्रशासनाने कारे गावात जाऊन त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेली त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा हाय रिस्क म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे

 

चाळकेवाडीतही कोरोनाचा शिरकाव
चाळकेवाडी आता कोरोणाचा एक रुग्ण आढळल्याने चाळकेवाडी बरोबरच आसपासच्या परिसरातील गावे ही भयभीत झाले आहेत गेल्या पाच दिवसापूर्वी मुंबई विक्रोळी येथून हे कुटुंब गावी आले यांना त्यांच्या घरी होऊन कोरण टाईम करण्यात आले होते त्यांना त्रास जाणवू लागल्याने वैद्यकीय अधिकारी मानसी पाटील यांनी ठोसेघर आरोग्य केंद्रात उपचार केले असता त्यांना करून आजाराची लक्षणे दिसल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले रविवारी त्यांना कुटुंबातील महिलेला पॉझिटिव रिपोर्ट आले असून कुटुंबातील तीनजण हाय रिस्कमध्ये असून लोरिस्क मध्ये तीस जण असून त्यांच्यावर प्रशासनाने देखरेख ठेवली आहे